| | |

नुसती काकडी नाही, तर तिच्या बियाही आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कुठलाही ऋतू असला तरी बाजारात सहज उपलब्ध होणारी काकडी किती फायदेशीर आहे हे आपण जाणतोच. आरोग्याचं म्हणाल तर, शारीरिक, मानसिक आणि त्वचा केस यांसाठी काकडी अत्यंत लाभदायक फायदे देते. साधारणपणे काकडी कोथिंबीर, सॅलड वा ज्यूस बनविण्यासाठी जास्त वापरली जाते. पण दोस्तहो, नुसती काकडी खाण्याचेही अनेक फायदे आहेत बरं का. जसे कि काकडीमुळे शरीराला थंडावा मिळतो. यामुळे शारीरिक दाह नियंत्रणात राहतो. तसंच काकडीसोबत तीच्या बियादेखील तितक्याच फायदेशीर आहेत. अंकांना काकडी आवडते पण तिच्या बिया तोंडात येतात हे आवडत नाही. म्हणून काकडी खाताना किंवा त्याचा एखादा पदार्थ वा ज्यूस बनविताना अनेकदा बिया काढून टाकल्या जातात. तर दुसरीकडे, अनेक ठिकाणी काकडीच्या बिया वाळवून त्यांचा मगज म्हणून वापर केला जातो. उत्तर हिंदुस्थानात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकडय़ांच्या बिया वाळवून त्यांच्या मिठाईमध्ये मगज म्हणून वापर केला जातो. जाणून घ्या काकडीच्या बियांचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

१) काकडीच्या बिया खाल्ल्यास आम्लाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी होते आणि पित्ताचा त्रास शमतो.

२) संसर्गजन्य ताप येत असल्यास काकडीच्या बिया आणि खडीसाखर एकत्र वाटून घ्या. हे मिश्रण ग्लासभर पाण्यासोबत १ चमचा घ्या. यामुळे ताप उतरतो.

३) घशात सतत कोरड पडत असेल आणि छातीत दुखत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्या.

४) उन्हाळ्यात शारीरिक दाह नियंत्रित करण्यासाठी काकडीसह काकडीच्या बिया खाणे फायदेशीर आहे. यामुळे उष्णतेच्या तक्रारी कमी होतात.

५) मासिक पाळीच्या दिवसात स्त्रियांना विविध त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच या दिवसांत चिडचिड, मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. या सर्व त्रासांवर आराम मिळवण्यासाठी काकडीच्या बिया फायदेशीर आहे.

६) मासिक पाळीत सतत पोट दुखणे, पाठ दुखणे आणि जास्त रक्तस्त्राव यामुळे स्त्रियांची शारीरिक क्षमता नमते. यासाठी काकडीच्या बिया वाटून खाणे फायदेशीर आहे.

७) लघवी कमी होणे किंवा अअडथळा येणे. याशिवाय लघवी करताना जळजळ होणे यावर काकडीच्या बिया कोणत्याही प्रकारे खाणे गुणकारी आहे.

८) अनेकदा बराचवेळ पोट रिकामी ठेवल्यास पित्त वाढते. असे पित्त कमी करण्यासाठी काकडीच्या बिया खाव्या.

९) त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी काकडीच्या बिया खाणे आणि वाटून चेहऱ्यावर लावणे दोन्हीही फायदेशीर आहे.

१०) त्वचेवरील डाग आणि मुरूम कमी करण्यासाठी काकडीच्या बिया वाटून चेहऱ्यावर लावाव्या. यामुळे काही दिवसांतच त्वचेवरील डाग आणि मुरूम नाहीसे होतात.

११) एखाद्या व्यक्तीचे वजन फारच कमी असेल आणि वजन वाढत नसेल तर त्याने दररोजच्या आहारात काकडीच्या बिया खाव्या. यामुळे हळूहळू वजन वाढते.