| |

हात पाय सुन्न पडणे आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक बाब; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल अतिशय व्यग्र जीवनशैलीमूळे अनेकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. पण मुळात या बदलत्या जीवनशैलीचा अतिशय वाईट परिणाम थेट आरोग्यावर होतोय आणि याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत हि गंभीर बाब आहे. अनेकदा असे होते कि दिवसभराच्या कामातून आपल्याला एखादा असा क्षण मिळतो जेव्हा आपले शरीर आराम करण्याचा विचार करते. परंतु जरा स्वस्थ बसल्यानंतर अचानक जर हात पाय सुन्न पडत असतील तर? तर अनेकदा आपण अतिव्यग्रता, ताण आणि दगदग हि करणे पुढे करून शांत बसतो. पण मुळात हि बाब गंभीर आहे याची आपण दखल न घेणे हि आणखी एक गंभीर बाब आहे. कारण अनियमित खाणं आणि अयोग्य दिनक्रम यामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता कमी झालेली असते. याशिवाय आपण आजारी पडण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे हळूहळू आपल्या शरीरात असे काही बदल होतात, जे आपल्याला जाणवत असतात, पण आपण त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. यापैकीच हि एक समस्या आहे.

– हात आणि पाय सुन्न होणं हि समस्या आजकाल अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांमध्ये दिसून येत आहे. ही एक अतिशय सामान्य समस्या असली तरी याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. चला तर जाणून घेऊयात याही कारणे :-

  1. रात्री बराच वेळ एकाच स्थितीत झोपल्यामूळे हात आणि पाय सुन्न होतात. परंतु सुन्न झालेल्या ठिकाणी थोडा वेळ मालिश केल्याने ही तक्रार पुन्हा जाणवत नाही. मात्र यानंतरही हात किंवा पाय सुन्न राहत असतील तर एखादा गंभीर आजार तुम्हाला जडला असण्याची शक्यता आहे.
  2. शरीरामध्ये रक्त संचरण जर योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने प्रत्येक अवयवापर्यंत होत नसेल तरीही हात आणि पाय सुन्न होतात. शिवाय हातापायाचे तळवे पांढरे देखील पडतात. असे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  3. गळ्यातील थायरॉईड ग्रंथीत कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यामुळे हात आणि पाय सुन्न होतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून रक्त तपासणी करून घ्यावी.
  4. मधुमेहाच्या आजाराने ग्रासलेल्या अनेक लोकांचे हात आणि पाय अचानक सुन्न होतात. म्हणूनच, जर तुम्हीही हि समस्या अनुभवली असाल तर एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
  5. बराचवेळ एका ठिकाणी बसून कॉम्प्युटरसमोर काम करणाऱ्या लोकांच्या मनगटाच्या नसांवर परिणाम होतो. यामुळे कार्पल टनल सिंड्रोम होऊ शकतो आणि यामध्ये हात व पाय सुन्न होण्याची शक्यता अधिक असते.
  6. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, पाठीच्या कण्याभोवती असलेल्या मज्जातंतूंवर दबाव येतो. अशा परिस्थितीत सर्वायकलचा त्रास होतो. परिणामी हात आणि पाय सुन्न होतात. याकरिता दररोज व्यायाम करणे फायद्याचे ठरते शिवाय हि बाब गंभीर होत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.