| | |

अनियंत्रित रागावर जायफळ करेल कंट्रोल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि, अतिशय लहान लहान गोष्टींवर आपला संयम सुटतो आणि रागावरचे नियंत्रण सुटते. परंतु आपल्या रंगावर आपला ताबा असणे अत्यंत गरजेची बाब आहे. परंतु वाढता ताण, तणावाची परिस्थिती आणि बदलती जीवनपद्धती यामुळे आपले मानसिक आरोग्य अडचणीत आले आहे. परिणामी, संयम कमी आणि राग जास्त अशी काहीशी स्थिती प्रत्येकाचीच झाल्याचे पाहायला मिळते. पण मित्रांनो, आपल्या आरोग्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या संधी आणि सोप्प्या गोष्टी अवघड होऊन जातील हे वेळीच लक्षात घ्या. शिवाय अति रागामुळे नातेसंबंधावरदेखील परिणाम होतो. कारण चिडणारी व्यक्ती ही कधीच कोणाच्या जवळ असावी असे कुणालाही वाटत नाही. निश्चितच तुमचा राग नियंत्रणात यावा म्हणून घरातील प्रत्येकाने शर्थीचे प्रयत्न करून पहिले असतीलआणि तरीही जर यश आले नसेल तर एकदा आणि फक्त एकदा जायफळचा इलाज करुन पाहा. कारण मन आणि डोकं दोन्ही शांत करण्यासाठी जायफळ फारच उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया राग शांत करण्यासाठी जायफळ कसे वापरलयास फायदेशीर ठरते ते खालीलप्रमाणे:-

० जायफळाचे फायदे – जायफळ हा असा पदार्थ आहे जो प्रामुख्याने एखाद्या गोडाच्या पदार्थाची विशेष चव आणि गंध वाढविण्यासाठी केला जातो. या जायफळाचे या व्यतिरिक्तदेखील बरेच फायदे आहेत. जसे कि –
१) जायफळाचा समावेश आहारात केल्यामुळे भूक लागते.
२) पोट साफ होण्यासाठी जायफळ मदत करते.
३) जायफळाचे सेवन केल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.
४) जायफळ खाल्ल्यामुळे निद्रानाशाचा त्रास दूर होतो.
५) जायफळ कोणत्याही स्वरूपात खाल्ल्यास डोकेदुखी थांबते.

० राग वा चिडचिड नियंत्रित करण्यासाठी जायफळाचा वापर असा करा –

१) जायफळ पूड अगदी चिमूटभर, दुधात घालून त्याचे सेवन करा. यामुळे गाढ आणि चांगली झोप लागते. कारण, अनेकदा अपुऱ्या झोपेमुळे राग अनावर होत असतो. त्यामुळे जर तुम्हालाही असे जाणवत असेल तर दररोज रात्री शांत झोपेसाठी जायफळाची पूड करुन ठेवा.

२) अख्खे जायफळ किसून थोडेसे कोमट दुधात घाला आणि दररोज रात्री झोपताना कपभर जायफळ दूध प्या. यामुळे डोकं आणि मन दोन्हीही शांत राहते.

३) जायफळाचे दूध प्यायची इच्छा नसेल तर, जायफळाचे गंधक दोन भुवयांच्या मध्ये लावा. यासाठी अख्खे जायफळ उगाळून त्याचा गंधक तयार करा. असे केल्यामुळे डोके शांत राहील आणि यामुळे चिडचिड होणार नाही.

० टीप
– हा प्रयोग दररोज कराल तरच फरक जाणवेल.

– त्यामुळे नियमित आणि मनापासून अतिरेक न करता हे उपाय करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *