| |

अरे बापरे! डार्क सर्कल्स आले? अहो चिंता कश्याला करताय हे उपाय वापरून तर पहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अपुरी झोप आणि कामाचा वाढता ताण या दोन्ही गोष्टी डोळ्या भोवती येणाऱ्या काळ्या वर्तुळास जबाबदार आहेत. इतकेच नव्हे तर हाय डिप्रेशन आणि झोपेची औषधे यांचाही परिणाम आपल्यावर होत असतो. जो डोळ्याभोवती येणाऱ्या काळ्या वर्तुळांच्या स्वरूपात दिसतो. परिणामी आपला चेहरा आजारी, थकल्यासारखा आणि मरगळलेला दिसतो. यानंतर चेहरा आरश्यात पाहिल्यानंतर आपल्यालाच कसंतरी वाटत. आजकाल पहाल तर डार्क सर्कल्सची समस्या अनेकांना आहे. यासाठी अनेकदा तुम्ही बटाटा, काकडीचे काप ठेवणे असे काही उपाय करून पहिले असाल. पण याचा फारसा परिणाम दिसून आला नसेल. तर काळजी करू नका. आता आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहोत ते घरगुती आहे त्यामुळे महागडे नाहीत आणि करायला देखील अगदी सोप्पे असल्यामुळे कुणीही करू शकाल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) डार्क सर्कल दूर करण्यासाठी गुलाबपाण्यात बुडवलेल्या कापसाचे बोळे वा पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे हा उपाय परिणामकारक आहे. पण याहीपेक्षा जालीम म्हणजे बदाम तेलात ऑरगॅनिक मध घालून मिश्रण तयार करा आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांच्या भोवती लावा. यामुळे अगदी काहीच दिवसात डोळ्या भोवताली आलेली काळी वर्तुळे हळू हळू नाहीशी होतील.

२) ग्रीन टी बॅगसुद्धा डार्क सर्कल्सवर प्रभावी आहे. कारण यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे ग्रीन टी बॅगचा उपयोग डोळ्यांखालील सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी होतो. शिवाय स्किन ब्लिचिंग आणि स्किन क्लीनजींगसाठी देखील ग्रीन टी बॅग फायदेशीर आहेत.

३) डार्क सर्कल्ससाठी आणखी एक घरगुती आणि सोप्पा उपाय म्हणजे दूध. होय. कारण दुधात लॅक्टिक अॅसिड, प्रोटीन, एन्झाईम्स आणि इतर अँटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे अतिशय उत्तम उपाय मानला जातो.

४) डोळ्यांखालील काळी वर्तुळं काही केल्या जात नसतील तर यासाठी बर्फ वापरावा. कारण बर्फामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. परिणामी डोळ्याखालील डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

५) सफरचंद जितके शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितकेच फायदेशीर त्वचा उजळ करण्यासाठी आहे. कारण सफरचंदात टॅनिक अॅसिड भरपूर असते. ज्याचा वापर त्वचा नैसर्गिकरीत्या उजळ करण्यासाठी होतो. परिणामी डोळ्याखालील काळे डाग किंवा चेहऱ्यावरील स्पॉट्स दूर करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. तसेच सफरचंदात व्हिटॅमिन बी, सी आणि पोटॅशियम अधिक असल्याने त्वचेचे आतून पोषण होते.

६) पुदिन्याचा वापर करून देखील डार्क सर्कल्स दूर करता येतात. कारण पुदिन्यात अँटीबॅक्टरील, अँटिसेप्टिक आणि अँटीमिक्रोबियल गुणधर्म आहेत.

७) डार्क सर्कल्सवर नाईट जास्मिन आणि ऑलिव्ह ऑईल एकत्र लावल्याने देखील लवकर परिणाम जाणवतो. कारण नाईट जास्मिन ऑईलमध्ये अँटी इन्फ्लामेटरी कंपाऊंडस असतात. तर ऑलिव्ह ऑईलमध्ये डार्क सर्कल्स कमी करणारे टोनर असतात.