| |

अरे बापरे! डेल्टा + व्हेरियंट फूफ्फुसांसाठी घातक; काय म्हणाले तज्ज्ञ? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरते ना ओसरते तोच तिसऱ्या लाटेची भीती लोकांना जगू देईना झाली आहे. त्यातही हि तिसरी लाट लहान मुलांवर प्रभावी असणार आहे अशी गंभीर शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमागील भितीचे कारण म्हणजे कोरोनाचा नवा व्हेरिअंट अर्थात डेल्टा + व्हेरियंट. या संदर्भात जगभरातील विविध देशांतील महान शास्त्रज्ञ या व्हेरिअंटबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. या संदर्भात केलेल्या अभ्यासाबाबत बोलताना त्यांनी काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे:-

डेल्टा + व्हेरिअंट आधीच्या डेल्टातुलनेत अधिक वेगाने पसरतोय का नाही हे अद्याप ठोस सांगता येणार नाही, यावर अजूनही संशोधन सुरु आहे. मात्र हा व्हेरिअंट फुफ्फुसांवर चिकटतो आणि त्याच्यावर गंभीर परिणाम करायला सुरुवात करतो, असे तज्ज्ञ सांगत आहेत. शिवाय फुफ्फुसांवर परिणाम करण्याचा त्याचा वेगही अधिक असेल इतकेच तूर्तास सिद्ध होत आहे. अर्थात तो जास्त नुकसान करणारा असेल किंवा अधिक वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असेल का? याबाबत अजूनही संशोधन सुरु आहे. साल २०२१ जून ११ यादिवशी डेल्टा + व्हेरिअंटची पहिल्यांदाच अधिकृत घोषणा केली होती. त्यानंतर आतापर्यंत जगातील अनेक देशांत हा व्हेरिअंट पोहोचला असल्याची माहिती आहे. भारतातील १२ राज्यांमध्ये आतापर्यंत ५१ रुग्णांना डेल्टा + ची लागण झाली आहे असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

मुख्य म्हणजे, लसीकरण झालेल्यांना या व्हायरसचा धोका कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे निदर्शनास देखील येत आहे. कारण, ज्यांना आतापर्यंत या व्हायरसची लागण झाली आहे, त्यातील बहुतांश लोक लसीकरण न झालेलेच आहेत. शरीरातील अँटिबॉडिजला डेल्टा+ किती आणि कसा प्रतिसाद देईल यावरही अजून संशोधन सुरु आहे. मात्र तरीही, लसीकरण झालेल्यांना डेल्टा+ पासून धोका कमी आहे, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. लसीकरण झालेल्यांना डेल्टा प्लसचा विशेष त्रास होत नसला तरीही ते या घटक व्हेरिअंटचे वाहक ठरू शकतात ज्यामुळे अन्य लोकांमध्ये याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होईल. यामुळे प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आणि योग्य ठरणार आहे.