| |

अरे बापरे! स्ट्रेच मार्क्स? आता चिंता सोडा आणि ह्या टिप्स वापरून पहा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल वजन वाढणे हि समस्या इतकी मोठी झाली आहे कि चार लोकांच्या मागे दहा लोकांना हि समस्या आहेच. म्हणा वजन वाढण्यामागे अनेको कारणे असतात. पण मग वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हीच लोक नाही नाही ते उद्योग आणि प्रयोग करताना दिसतात. मग यासाठी खूपवेळा जिममध्ये घाम गाळणे असेल नाहीतर पद्धतीशीर डाएट करणे असेल. अश्या कोणत्या ना कोणत्या मार्गांचा अवलंब करून वजन कमी केले जाते. पण वजन कमी करण्यासोबत आणखी एक समस्या भेडसावते आणि हि समस्या म्हणजे वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे. हि समस्या स्वाभाविकपणे कितीही सर्वसामान्य असली तरीही दिसताना थोडे विचित्र दिसते त्यामुळे एक भलताच न्यूनगंड बाळगला जातो. म्हणून आता न्यूनगंड बाळगण्याची किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला काही अश्या हलक्या फुलक्या टिप्स म्हणा किंवा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.

१) वजन कमी करा पण हळूहळू
– पटकन वजन कमी केल्यामुळे त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरील थरात म्हणजेच डर्मिसमध्ये कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. म्हणूनच स्ट्रेस मार्क्सवर मात करायची असेल तर वाढते वजन हळूहळू कमी करा.

२) दररोज स्ट्रेचिंग करायला विसरू नका
– दैनंदिन जीवनात कितीही गडबड असली कितीही व्यग्रता असली तरीही दररोज हलकं स्ट्रेचिंग कराच. कारण त्यामुळे रक्तप्रवाह आणि त्वचेची इलॅस्टिसिटी सुधारते. परिणामी स्ट्रेच मार्क्सला आळा बसतो.

३) व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा
– त्वचेचे टिशू सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए चा फायदा होतो. याशिवाय व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती प्रक्रिया सुधारते. यासाठी आहारात या व्हिटॅमिन्सचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या व्हिटॅमिन्सच्या संतुलनाचा फायदा स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी होतो.

४) भरपूर पाणी प्या
– भरपूर पाणी प्यायल्याने आपले शरीर नेहमी हायड्रेट राहते आणि हे गरजेचे आहे. कारण शरीराच्या डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. परिणामी त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स वाढण्याची शक्यता असते. म्हणून प्रत्येकाने दररोज ८ ग्लास पाणी प्यावे यामुळे स्ट्रेच मार्क्सची समस्या त्रास देणार नाही.

५) स्किन क्रीम किंवा लोशनचा वापर करा
– स्किन क्रीम किंवा बॉडी लोशन वापरल्यामुळे शरीरातील कोलेजनचे प्रमाण वाढेल आणि आपोआपच स्ट्रेच मार्क्सला आळा बसेल. पण कोणतेही स्किन क्रीम आणि लोशन आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा.