Oil For Baby Massage
|

Oil For Baby Massage | हिवाळ्यात ‘या’ तेलांनी करा बाळाची मालिश, शरीर होईल निरोगी आणि तंदुरुस्त

Oil For Baby Massage | लहान मुलांसाठी आपण अनेक नवीन प्रोडक्ट वापरात असतो. लहान मुलांनाही मालिश वेळेवर होणे देखील तेवढेच गरजेचे आहे. बाजारात काही तेल उपलब्ध आहेत ज्या तेलांनी दररोज मसाज केल्याने मुलांची त्वचा मुलायम आणि निरोगी राहते. हिवाळ्यात मुलांची मालिश करण्यासाठी कोणते तेल वापरावे ते जाणून घेऊया.

मसाज केल्याने शरीर मजबूत होते आणि मुलाचा विकास चांगला होतो, असे तुम्ही तुमच्या आजींचे म्हणणे ऐकले असेल. हिवाळ्यात अशा तेलाची निवड करावी ज्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म असतील, जे मुलांच्या शरीराला आतून उबदार ठेवू शकतात.

हेही वाचा – Flours For Weight Loss | हिवाळ्यात वजन कमी करायचे असेल तर आहारात करा ‘या’ 5 प्रकारच्या पिठाचा समावेश

हिवाळ्यात मोहरीचे तेल खूप फायदेशीर असते. त्यात व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड सारखे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. ऑलिव्ह ऑईल हिवाळ्यात त्वचा आणि केस दोघांसाठी खूप फायदेशीर आहे. या तेलाने नियमित मसाज केल्याने त्वचा मुलायम, चमकदार आणि हायड्रेट राहते.

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स सारखे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हे गुणधर्म मुलांची त्वचा मऊ आणि कोमल ठेवण्यास मदत करतात.तसेच बदामाच्या तेलाने मसाज केल्याने मुलांचे शरीर आतून उबदार राहते.