cumin
| | | |

फक्त 1 चमचा जिरं आरोग्यासाठी उत्तम औषधी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। डाळ असो, भाजी असो किंवा मग अन्य फोडणीचा कोणताही पदार्थ असो त्याच्या फोडणीत जिरं नसेल तर फोडणीला काही मजा येत नाही. त्यामुळे आहारात जिरं असायला हवंच. पण तुम्हाला काय वाटत जिरं फक्त फोडणीपुरताच महत्वाचे आहे. तर तुम्ही चुकताय. कारण जिऱ्याचा फक्त फोडणीसाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठीदेखील भरपूर फायदा आहे. अगदी वजन कमी करण्यापासून, सांधेदुखी, लोहाची कमतरता अश्या अनेक समस्यांवर जिरं प्रभावी आहे. यासाठी फार जिरं लागत नाही. फक्त १ चमचा जिरं कमालीचे फायदे देत. तेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

फक्त १ चमचा जिऱ्याचे फायदे:-

1. पोटाच्या समस्यांपासून आराम - 
डायरिया, अपचन, पोटात गॅस होणं, फोटफुगी या सर्व पोटाशी संबंधीत समस्यांपासून आराम हवा असेल तर जिऱ्याचा अर्क प्या. याशिवाय ताकात जिरेपूड टाकून प्यायल्यासदेखील या समस्या दूर होतील.
Bones
2. हाडं आणि सांध्यांच्या दुखण्यावर प्रभावी - 
जिऱ्यामध्ये दाहविरोधी, सूजविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे हाडं आणि सांध्यांच्या वेदनांसाठी जिऱ्याचं पाणी किंवा भाजलेलं जिरं चावून खा. यामुळे जिऱ्यातील थाएमोक्विनोन घटक सांध्याचा दाह, सूज आणि वेदना दूर करेल.
Blood
3. ॲनेमियापासून बचाव - 
रक्तातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी जिरे फायदेशीर आहे. कारण जिऱ्यांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर     असतं. म्हणून जिऱ्याचे नियमित सेवन केल्यास लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनेमियासारखा आजार टाळता येतो.
4. मासिक पाळीच्या वेदना होतील दूर - 
मासिक पाळीत पोटदुखी, पाठदुखी, उलट्या अशा समस्या जाणवत असतील तर मासिक पाळीच्या दिवसात रोज १ ग्लास जिऱ्याचं पाणी प्या. यामुळे मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून मुक्तता मिळेल.
5. सौंदर्यवर्धक जिरे - 
सौंदर्य खुलविण्यासाठी जिरे फायदेशीर आहे. निस्तेज त्वचा, त्वचेवरील सुरकुत्या यावर उपाय म्हणून जिऱ्याचं पाणी प्या. कारण जिऱ्यात ई जीवनसत्त्वं असतं.जे त्वचा आणि केस निरोगी राखण्यास मदत करतात.
6. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर - 
शरीरातील चरबी कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी उपयुक्त आहे. यासाठी एका भांड्यात १ ग्लास पाणी उकळून १ चमचा जिरे घाला. हे पाणी ५-७ मिनिटं उकळून घ्या आणि कोमट झाल्यानंतर प्या.