| |

फक्त 2 व्यायामाचे प्रकार करतील झटपट वेट लॉससाठी मदत; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजकाल चुकीची जीवनशैली, अनियमित आहार, अपुरी झोप हे जणू दैनंदिन शेड्युल झालं आहे. जगातील किमान ७५% लोकांची दैनंदिन कार्यशैली हि अशीच आहे. परिणामी आरोग्याच्या बहुसंख्य तक्रारी. यातील अगदी सर्वसामान्य तक्रार म्हणजे वजन वाढणे. यासाठी लोक काय काय करतात हे काही वेगळं सांगायला नको. भरपूर व्यायाम, डाएट, उपासमार, यातलं काहीच नाही तर मग वजन कमी करणारी औषधे. या सगळ्याचा अतिरेकच कुठे ना कुठे आपल्याला आतून कमकुवत करीत असतो. शिवाय वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक इंटरनेटवरील माहितीचा वापर करतात आणि ते योग्य पद्धतीने न झाल्यास रडारड करतात.

वेट लॉससाठी वेगवेगळे डाएट प्लान, एक्सरसाइज आणि इतर पद्धती फॉलो करूनही जर वजन कमी झालं नाही तर..? मग काय निराशा. नाही. पण यावेळी असं होणार नाही. कारण तज्ज्ञ सांगतात कि फक्त २ व्यायामाचे प्रकार नियमित केले तरीही वजन अगदी पटापट कमी होईल. हे दोन व्यायामाचे कोणते प्रकार आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत.

० झटपट वजन कमी करणारे व्यायामाचे 2 प्रकार

ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोज सकाळी उठून २ एक्सरसाइज कराव्या. या एक्सरसाइजसाठी कोणत्याही साहित्याची गरज नाही. तसेच कुणीही कोणत्याही वयात या एक्सरसाइज करू शकतात.

१) पुश अप्स किंवा प्रेस अप
पुश अप एक्सरसाइजने शरीराच्या वरच्या भागाला ताकद मिळते. पुश अप एक्सरसाइजने मसल्स टोन होतात, सोबतच झोपेतही सुधारणा होते. या एक्सरसाईजमुळे एकतर ताकद मिळते. मसल्स मजबूत होतात आणि थकवा निघून जातो. यामुळे मेंदूवरील ताण दूर होतो.

२) स्क्वॉट एक्सरसाइज
स्क्वॉटने लोअर बॉडीसोबत मेंदूला फायदा होतो. स्क्वॉट एक्सरसाइजने मेंदूच्या कार्यात सुधारणा होते. या एक्सरसाईजमुळे एकतर शरीरातील अन्यायी बळकट होतात. यामुळे नसांवर आलेला ताण दूर होते. अंगदुखीपासून सुटका मिळते.

० कधी करायच्या या एक्सरसाइज?
नियमित सकाळी पुश अप आणि स्क्वॉट करा. रोज सकाळी उठून कमीत कमी ४० पुश अप आणि त्यानंतर स्क्वॉट एक्सरसाइज करा. नव्याने सुरूवात करत असाल तर थोडं थोडं करून नियमित जमेल तास वेळ वाढवा. एकाच दिवशी खूप जास्त वेळ एक्सरसाइज करू नका.