| | |

पावाचे अतिसेवन देई गंभीर समस्यांना निमंत्रण; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्याकडे एकवेळ घरात डाळ, भात, भाजी, चपाती खाणे टाळले जाईल पण मस्का पाव, वडापाव, भजीपाव, भुर्जीपाव किंवा मग पाव भाजी हे असे चमचमीत पदार्थ अगदी चवीचवीने खाल्ले जातात. मुक्त या पदार्थांची खासियत म्हणजे हे पदार्थ चवीला अतिशय लाजवाब आणि पोटाची भूक शमवणारे असतात. पण हे पदार्थ पावाशिवाय अधुरेच म्हणावे लागतील.

पाव चवीसाठी कितीही उत्तम असला तरीही त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत असतात. हे दुष्परिणाम अगदी सहजरित्या कळून येत नसले तरीही ते शरीराची आंतरक्रिया बिघडवत असतात. मुळात पाव पचायला जड असल्यामुळे याचा पचन संस्थेवर होतो आणि पोटाच्या समस्या उदभवतात. चला तर जाणून घेऊयात अति पाव खाण्याचे शरीरावर होणारे गंभीर परिणाम कोणते ते खालीलप्रमाणे:-

१) रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते – पावामध्ये रिफाईन्ड साखर असते जी मेटॅबॉलिझमच्या कार्यावर परिणाम करते. तसेच स्वादूपिंडातून अधिक इन्सुलिन शोषले गेल्यामुळे रक्तातील साखर एकावेळी अधिक प्रमाणात वाढते.

२) गॅसेसची समस्या – पावासारख्या पदार्थांमध्ये लॅक्टोज अधिक असल्याने ब्लोटींगचा त्रास किंवा गॅसची समस्या उदभवते. यामधील ग्ल्युटेन पचायला अतिशय जड असते. त्यामुळे पावाचे पदार्थ पचायला कधीकधी ३ दिवसाहून अधिक वेळ लागू शकतो.

३) वजन वाढते – पावामध्ये अतिप्रमाणात साखर किंवा फ्रुक्टोज कॉर्न सिरप समाविष्ट असते. यामुळे कॅलरी प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे नेहमी पावासोबत वडा, समोसा खाण्याची आवड तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते.

४) पोषणद्रव्यांची कमतरता – पावामधून फायबर, व्हिटॅमिन किंवा मिनरल्स मिळत नाहीत. त्यामुळे पाव हेल्दी बनवण्यासाठी वडापाव किंवा भुर्जीपाव घरीच पौष्टिक पदार्थांसह तयार करा. यासाठी पावाऐवजी गव्हाचा ब्रेड किंवा मल्टीग्रेन पावासोबत खा. याचा विशेष लाभ मिळेल.

५) अॅलर्जिक रिअॅक्शन होते – पाव बनवताना त्यामध्ये एन्झाईम्स मिसळतात. यामुळे पाव बरेच दिवस चांगला राहतो आणि मौदेखील राहतो. मात्र यामुळे काही लोकांना अॅलर्जिक रिअॅक्शन होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *