|

घरगुती उपायांच्या सहाय्याने करा काविळीवर मात; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. हिपेटायटिस ई हा व्हायरस दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून पोटात जातात व यकृतावर हल्ला करतात. यालाच आपण कावीळ म्हणतो. सर्वसाधारण त्वचेचा रंग पिवळट दिसणे, अरुची (अन्नाचा तिटकारा), क्वचित उलटया होणे ही काविळीची सुरुवातीची लक्षणे आहेत. संसर्गजन्य काविळीत आधी ज्वर, मूत्र गडद पिवळे किंवा लाल होणे, रोधजन्य काविळीत मलाचा रंग मातीसारखा असणे, त्वचेस खाज सुटणे, फार तीव्र प्रकारात त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाडी अतिशय मंद गतीने चालणे अशी लक्षणे आढळतात. अतितीव्र काविळीत पित्तरंजक द्रव्याबरोबरच इतर विषारी पदार्थ रक्तात साठल्यामुळे बेशुध्दी वा मृत्यूची संभाव्यता असते. सुरुवातीला सामान्य वाटणारा हा रोग अचानक धोकादायक असल्याचे समजते, म्हणूनच यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. अनेकदा कावीळ झाल्यावर लोक औषधे घेतात, परंतु काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील कावीळपासून मुक्त होता येते. पण महत्वाचे असे कि काविळीची तीव्रता सौम्य असेल तरच हे उपाय करावे अन्यथा डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करून घेणे हाच पहिला आणि शेवटचा पर्याय आहे.

० कावीळ रोग बरा करण्यासाठी घरगुती उपाय –

१) तुरटी बारीक करून यात थोडे दही मिसळून खावे. यामुळे कावीळ ३-७ दिवसात बरी होते.

२) मुळ्याच्या पानांचा रस काढून त्यात १ ग्रॅम साखर मिसळून रुग्णाला द्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे घेतल्याने कावीळ आठवड्याभरात बरी होते.

३) काळी मिरीची बारीक पावडर करून पातळ ताकात मिसळून घेतल्याने कावीळ पासून लवकर आराम मिळतो.

४) पुदिन्याच्या पानांचा रस आणि यात थोडी साखर मिसळून खाल्ल्याने कावीळपासून सुटका मिळते.

५) बीटरूट, मुळा, गाजर, पालक, संत्र, नाशपाती, द्राक्ष आणि लिंबाचा रस, तसेच ताज्या भाज्यांचा रस काविळीमध्ये अतिशय चांगला फायदा देतात.

६) काविळीपासून बचावासाठी १ चमचा ग्लुकोज १ कप पाण्यात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी प्या. यामुळे कावीळमध्ये फायदा होतो.

७) कावीळच्या उपचारात बार्लीचे पाणी, शहाळे नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

८) कावीळमध्ये कोणत्याही स्वरूपात आवळ्याचे सेवन करा. यामुळे कावीळपासून लवकर सुटका मिळते.