| | |

टँगी टोमॅटो केचअपचे अतिसेवन आरोग्यासाठी अति हानिकारक; जाणून घ्या दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जंक फूड आजकाल प्रत्येकासाठी जणू जीव का प्राण झाला आहे. बघा ना प्रत्येकाच्या आईचे ठरलेले वाक्य असते कि, घरचे गोड लागत नाही पण बाहेरच द्या लगेच खाईल. काय? तुमच्याही बाबतीत असच आहे का? काय करणार? आजकालच्या धापवळीच्या जगात आणि व्यस्त जीवनशैलीत सगळंच झटपट हवं असत. त्या नादात लागतात अश्या सवयी. ज्या जिभेसाठी पूरक आणि शरीरासाठी हानिकारक असतात. आता जंकफूड म्हणजे काय हे काय वेगळं सांगायला नको. पण जंकफूडसोबत येत ते टोमॅटो केचअप…आहा… टँगी टोमॅटो केचअप. बर्गर असो नाहीतर पिझ्झा आणि फ्रेंच फ्रीज त्याच्यासोबत तर टोमॅटो केचप हवाच नाही का?

इतकेच काय तर सॅंडविज, चायनिझ, पास्ता अशा प्रकारातही भूरपूर टोमॅटो केचअपचा वापर होतो. त्यामुळे याची इतकी सवय लागली आहे कि, अगदी घरातली सही भाजी, ऑम्लेट, टिक्की, पॅटिस, थालीपिठ नाहीतर पराठा कितीही चविष्ट असला तरीही तोंडी लावायला.. आई थोडा टोमॅटो केचअप दे ना! साधा सुधा चवीला हटके असणारा हा टोमॅटो केचप चवीला कितीही भारी लागला तरीही आरोग्यासाठी पण भारीच पडतो हे विसरून चालणार नाही. कारण कोट्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. चला तर जाणून घेऊयात याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

१) अॅसिडिटी – टोमॅटो केचअप हा एक आंबट पदार्थ आहे. ज्याचे सेवन अति केल्याने शरीरातील अॅसिडिटीचे प्रमाण अगदीच वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला सतत पोटात दुखत असेल, पोट जड वाटत असेल, मळमळ जाणवत असेल तर हा अती प्रमाणात केचअप खाण्याचा दुष्परिणाम असू शकतो. म्हणूनच, जर छातीत जळजळ आणि अॅसिडिटी होऊ नये असं वाटत असेल तर कृपया आपल्या आहारातील केचअपचे प्रमाण आधी कमी करा. शक्य तेव्हा हा पदार्थ खाणे टाळा.

२) फूड अॅलर्जी – काही लोकांना अन्नपदार्थांत वापरल्या जाणाऱ्या खायच्या रंगाची अॅलर्जी असते. बऱ्याच कंपन्यांच्या केचअपमध्ये त्याचा रंग दाट आणि लालसर दिसावा यासाठी फूड कलर वापरण्यात आलेले असतात. या रंगामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या, सर्दी, खोकला, पित्त, अंगावर रॅशेस येणे, घास खवखवणे, उष्णता पडणे अशा समस्या होतात. त्यामुळे अशी कोणतीही समस्या आढळल्यास लगेच केचअप खाणे पूर्णपणे बंद करा.

३) किडनीवर ताण – टोमॅटो केचपमध्ये अख्खे टोमॅटो वापरले जातात. यामुळे टोमॅटोच्या बियादेखील यात वापरलेल्या असतात. मात्र टोमॅटोच्या बिया पोटात विरघळत नाहीत. जरी केचअप बनविताना त्यातील बिया काढलेल्या असल्या तरीही त्यातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढू शकते. परिणामी शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते आणि मूत्राशयातून याचा योग्य निचरा न झाल्यामुळे त्याचा ताण किडनीवर येतो. परिणामी किडनीच्या समस्या होण्याची शक्यता वाढते.