| |

पोटावर पँट आणि पॅन्टवर घट्ट पट्टा दोन्हीही ठरू शकते प्राणघातक; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दररोज रोजीरोटीसाठी कार्यालयात जाऊन काम करणाऱ्या पुरुषांचा पेहराव हा सर्वसामान्यपणे पॅंट शर्ट असा असतो. अनेकजण पॅंट पोटावर परिधान करीत त्यावर घट्ट पट्टा बांधणे पसंत करतात. तर काहीजण घट्ट घेराची पॅण्ट परिधान करणे पसंत करतात. मात्र दररोज पोटावर पॅन्ट आणि त्यातही त्यावर घट्ट पट्टा बांधण्याची सवय चांगली नसून याने शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. इतकेच नव्हे तर ही सवय काहींसाठी प्राणघातकही ठरू शकते. बराच काळ पोटाला जखडून पट्टा किंवा पॅन्ट बांधल्याने पोटाचे अनेक नानाविध आजार होऊ शकतात. याशिवाय गळ्याचा कर्करोगही होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही हि सवय असेल तर वेळीच सावध व्हा..!

पोटाला घट्ट जखडुन ठेवल्याने सांध्याची समस्या बळावते. त्यात दीर्घ काळ घट्ट पट्टा बांधल्याने मणक्‍याची हाडे देखील कमकुवत होतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये बदल झाल्यास गुडघ्याच्या सांध्यावर गरजेपेक्षा अधिक दाब पडतो आणि यामुळे सांधेदुखीचा त्रास संभवतो. इतकेच नव्हे तर यामुळे शारीरिक क्रियांपैकी एक पचनक्रियेस देखील हानी पोहोचते. यामुळे अन्न पचन चांगल्या प्रकारे होत नाही आणि बद्धकोष्ठतेची समस्या उदभवते. पोटाच्या नसांवर दाब पडल्यामुळे पोटाच्या स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. इतकेच नव्हे तर सतत घट्ट पट्टा बांधल्याने धमन्या, रक्तवाहिन्या, स्नायू आणि छोट्या आतड्यांसह मोठ्या आतड्यांवर अतिशय दाब येतो व त्यांवर सूज चढते. यामुळे पुरूषांमध्ये शुक्राणुंची संख्या कमी होते. पुरूषांमधील वंधत्व वाढण्याचे प्रमाण याच कारणांमुळे जास्त आहे.

शिवाय ज्या व्यक्ती लठ्ठ असतात आणि घट्ट पट्टा किंवा घट्ट घराच्या पंत परिधान करतात त्यांची अन्ननलिका आणि पोट यांच्यातील वॉल्वमध्ये इतरांपेक्षा जास्त दाब पडतो. त्यामुळे मुख्यत्वे शरीरात तयार होणारे ऍसिड रिफ्लक्‍स येण्याचा त्रास होतो. कारण पोटात तयार होणारे आम्ल घशाजवळ येते आणि या आम्लामुळे घशाच्या पेशी हळूहळू नष्ट होऊ लागतात. घशाच्या पेशी अश्याप्रकारे नष्ट झाल्याने घशाचा कर्करोग होण्याची संभवत बळावते. याशिवाय पायाला सूज येणे, तसेच पोटदुखी, हाडांच्या समस्या आणि कंबरदुखीची समस्या तोंड वर काढते. कंबरेच्या आजूबाजूला दबाव निर्माण झाल्याने पायांना सूज येऊन त्या जागी रक्ताभिसरणास देखील समस्या निर्माण होते.