Paracetamol Tablets
|

Paracetamol Tablets : डेंगू- मलेरिया यासारख्या आजारावर उपाय म्हणून पॅरासिटीमॉल घेताय? आत्ताच व्हा सावध!!

हॅलो आरोग्य ऑनलाईन । पावसाळ्याच्या दिवसात साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर होत असतात. यामध्ये डेंगू,मलेरिया यासारखे आजारांना तर ऊत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळे ताप काही लवकर कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाही. वारंवार ताप आल्याने डॉक्टर आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात परंतु अशावेळी आपण घरच्या घरी देखील अनेकदा उपयोग करत असतो आणि तुम्ही घरच्या घरी पॅरासिटीमॉलच्या गोळ्या (Paracetamol Tablets) खात असाल तर या सर्वांचा तुमच्यावर भविष्यात काय परिणाम होणार हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे, अन्यथा एक आजार कमी करताना दुसरा आजार देखील शरीरामध्ये निर्माण होऊ शकतो.जर वारंवार पॅरासिटीमॉलच्या गोळ्या आपण खाल्ल्या तर त्याच्या मुळे शरीराला काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आता आपण जाणून घेणार आहोत.

एखाद्या व्यक्तीला डेंगू, मलेरिया झाल्यावर शरीरामध्ये कडक ताप येऊ लागतो. शरीरामध्ये वेदना, उलटी, मळमळ, बैचेनी यासारखी लक्षणे रुग्णांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येतात अशावेळी रुग्णाला पॅरासिटीमॉलची गोळी दिली जाते. गोळी डेंगूच्या रुग्णांसाठी सुरक्षितता मानली जाते तसेच तापासारखी लक्षणे कमी होण्यासाठी मदत देखील होत असते . ही गोळी सेवन केल्याने शरीरातील लक्षणे कमी होण्यासाठी मदत होत असते. या गोळ्या डोकेदुखी, मायग्रेन, मासिक पाळी इत्यादी त्रासाच्या वेळी आवर्जून खाल्ल्या जातात. परंतु जर तुम्ही दीर्घ काळापासून पॅरासिटीमॉल गोळ्यांचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. या गोळी सेवनाचे मानवी शरीरावर दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात.

काय आहेत पॅरासिटीमॉल गोळीचे दुष्परिणाम? (Paracetamol Tablets)

या पॅरासिटीमॉल गोळीचे (Paracetamol Tablets) अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन केल्याने झोप येणे, थकवा जाणवणे, शरीरावर चट्टे, वारंवार खाज निर्माण होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकांना थकवा, श्वास घ्यायला त्रास होणे, हात पाय थंड पडणे आणि लिव्हर आणि किडनीला नुकसान होते. तुम्ही जर हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल तर तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅक देखील येऊ शकतो. पोटामध्ये दुखणे, उलटी होणे, हाय स्टेजवर तुम्ही कोमा मध्ये देखील जाऊ शकता म्हणूनच कोणत्याही औषधांचे सेवन करत असताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. जर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप आला असेल तर घरच्या घरी उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा भविष्यात तुम्हाला गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते परिणामी मृत्यू देखील वाढवू शकतो.

जर तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या रिएक्शन दिसून आल्या तर गुंतागुंतीची समस्या देखील निर्माण होऊ शकते म्हणूनच शक्य तितक्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या सेवन करा. डेंगू मलेरिया ताप अशा आजारांच्या वेळी आपल्या घरातील वातावरण देखील चांगले असणे गरजेचे आहे. तुम्ही घरामध्ये धूर तयार करून घरातील डास दूर करू शकता. डास चावल्याने प्रामुख्याने मलेरिया ताप येत असतो, अशावेळी घराची स्वच्छता ठेवणे व आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे.

टीप: वरील माहिती सर्वसाधारणपणे सांगण्यात आलेली आहे कोणत्याही माहितीचा/ उपायाचा वापर करण्याआधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.