Dragon Fruit
| |

भाग 1: ड्रॅगन फ्रुट मुलांच्या विकासासाठी मदतयुक्त; कसे खायला द्यालं? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लहान मुलांच्या आरोग्याची काळजी त्यांच्या पालकांनाच घ्यावी लागते. कारण एकतर लहान मुलं कोणतीही गोष्ट करायच्या आधी अतिशय आळस दाखवतात. त्यात खायच्या बाबतीत तर अगदी उच्छाद मांडतात. अगदी बिस्कीट जरी खायचं असेल तरीही लहान मुले आईला भयंकर दमवतात. यामुळे मुलांना व्यवस्थित खाऊ पिऊ घालणं अतिशय कठीण होऊन जात. कारण मस्ती आणि दंगा करायच्या नादात मुलं व्यवस्थित खात नाहीत आणि यामुळे त्यांना आवश्यक पोषण मिळत नाही. अशावेळी मुलांना ड्रॅगन फ्रुट खायला देणे अतिशय फायदेशीर ठरते.

ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर पोषण असते जे मुलांना आजारांपासून दूर ठेवू शकता. कारण या फळामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. शिवाय हिस्टिडाइन, लाइसिन, मेथिओनाइन आणि फेनिलॅलानिन या घटकांसह पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. हे सर्व घटक लहान मुलांचा विकास करण्यास सहाय्यक आहेत.

म्हणूनच भाग १ मध्ये मुलांना ड्रॅगन फ्रुट कसे खायला द्यावे ते आपण जाणून घेणार आहोत. तर भाग २ मध्ये मुलांसाठी इतर कोणते फायदे होतात हे जाणून घेऊ.

० लहान मुलांच्या विकासासाठी ‘ड्रॅगन फ्रूट’ असे खायला द्या

१) तुमचं मुलं खूप लहान असेल तर जसे नाचणीचे सत्त्व बनवता तशी ड्रॅगन फ्रूटची प्युरी बनवा आणि ती मुलांना खाऊ भरवा. यासाठी ड्रॅगन फ्रूटच्या आतील भाग कापून त्याचा रस तयार करा आणि मुलांना भरवा.
२) ड्रॅगन फ्रूट आणि पाइन ऍपल स्मूदी असे कॉम्बिनेशन मुलांना जास्त आवडेल. कारण पदार्थ आकर्षक आणि चविष्ट दोन्ही असेल तर मुलांना खाऊ घालताना टेंशन येत नाही. यासाठी ड्रॅगन फ्रुट आणि पाइन ऍपल दोन्ही चांगले धुवून चिरून घ्या. रस बनवण्यासाठी दोन्ही फळांचे बारीक काप करा. ग्राईंडरमध्ये मस्त फिरवून घ्या आणि आता एका ग्लासात स्मूथी काढून फळाचे चिरलेले तुकडे वरून घाला.
३) ड्रॅगन फ्रुटचा गर काढून घ्या आणि मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्या. यामध्ये सब्जाचे भिजवलेले बी घालून काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. नंतर ते बाहेर काढा आणि त्यावर ड्रॅगन फ्रूटचे छोटे छोटे तुकडे टाका आणि मुलाला खायला द्या.
४) स्ट्रॉबेरी, किवी, ड्रॅगन फ्रूटचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्या.मुलांना खाऊ द्या.

अशाप्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना ड्रॅगन फ्रुट खाऊ घालू शकता.