Iching
| |

भाग 1: अंगाला सतत खाज येते?; जाणून घ्या कारणे आणि घ्यावयाची काळजी

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दिवसभराचं रुटीन हे प्रत्येकाचं ठरलेलं असत. या रुटीनमध्ये अख्ख्या दिवसात धूळ, माती, प्रदूषण या प्रत्येक समस्येला आपलं शरीर आणि त्वचा सामोरी जात असते. यामुळे होत काय कि शरीराचे आरोग्य आतून जितके खराब होते तितकेच त्वचेचे आरोग्य लवकर आणि जास्त प्रमाणात खराब होत असते. कारण या प्रत्येक समस्येला आपली त्वचा थेट सामोरी जात असते. एकतर घामामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते. त्यात धुळीचे सूक्ष्म कण त्वचेवरील बारीक छिद्रांमध्ये शिरकाव करतात आणि त्वचेचे तसेच शारीरिक आरोग्य बिघडवतात. यामुळे अनेकदा खाज, रॅशेस, लाल चट्टे, पुरळ असा त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

वैद्यकीय भाषेत या खाजेच्या समस्येला प्रूरिटस असं म्हणतात. धूळ आणि मातीच्या सूक्ष्म विषाणूंमुळे ही समस्या उद्भवते. रक्तसंक्रमणामुळे फोड आणि पुरळ येतात आणि त्यानंतर शरीरावर खाज येते. खाजेचे एकूण चार प्रकार असतात. ज्याबद्दल सर्वांनाच माहिती असेल असे काहीही नाही. यात,
– काही वेळा खाज आली तर पुरळ येत नाहीत.
– खाज संपूर्ण त्वचेवर अर्थात पाय, चेहरा, बोटं, नाक, हात अथवा आपल्या गुप्तांगामध्ये येते.
– खाज ओली वा कोरडी असते. त्यामुळे जर तुमची त्वचा कोरडी असेल तर खाजेचा त्रास जास्त प्रमाणात होतो.
– अनेकांना अति घामामुळे खाज येते तर अनेकांना अति थंडीमध्ये खाज येते.
आज आपण भाग १ मध्ये त्वचेला खाज येण्याची कारणे जाणून घेणार आहोत शिवाय खाज येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी जाणून घेऊ. यानंतर भाग २ मध्ये आपण त्वचेला सुटणाऱ्या खाजेसाठी कोणते घरगुती उपाय करता येतील ते जाणून घेऊ.

० अंगाला खाज येण्याची अनेक कारणे

1. चुकीचा साबण
2. केमिकल अलर्जी
3. पित्त
4. कोरडी त्वचा
5. किटक दंश

6. सनबर्न
7. कांजिण्या
8. लोहाची कमतरता (एनिमिया)
9. कावीळ
10. किडनी रोग

11. गर्भावस्था
12. सोरायसिस (त्वचा रोग)
13. त्वचेवर लाल पट्टे (डर्मेटायटिस)
14. स्किन एजिंग
15. एखाद्या औषधाचा दुष्परिणाम

० खाज येऊ नये म्हणून अशी काळजी घ्या

१) नियमित स्वच्छ आणि कोमट पाण्याने आंघोळ करा.
२) सुती वा कॉटनचे व्यवस्थित कोरडे झालेले कपडे परिधान करा.
३) त्वचा नियमित मॉईस्चराईज करा.
४) केमिकलयुक्त साबण आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करू नका.
५) त्वचा डिहायड्रेट होऊ नये म्हणून नियमित ६-७ ग्लास पाणी प्या.