Bowel Cancer
|

भाग 1: आतड्याचा कर्करोग कसा ओळखावा..?; जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। नुसता कॅन्सर हा शब्द एखाद्याच्या पायाखालची जमीन काढून घेण्यासाठी पुरेसा आहे. कारण कॅन्सर हा आजार इतका जीवघेणा आहे की त्यावर वेळीच उपचार न झाल्यास माणसाचा जीव जाण्याची शक्यता असते. कर्करोगाचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व प्रकार विविध कारणांमुळे होऊ शकतात. यापैकी एक म्हणजे आतड्याचा कर्करोग. आतड्याचा कर्करोग हा कोलोरेक्टल कर्करोग म्हणून ओळखला जातो. हा कर्करोग सहज समजून येण्यात अडचण येते आणि परिणामी माणूस दगावतो.

आतड्याचा कर्करोग हा आतड्याच्या आतील आवरणातून विकसित होतो. सर्व सामान्यतः यामध्ये पॉलीप्सच्या वाढीचा समावेश होतो. योग्य वेळी निदान न झाल्यास हा कर्करोग अतिशय प्राणघातक कर्करोग बनू शकतो. हा कर्करोग कुठून सुरु झाला आहे यावर अवलंबून आतड्याच्या कर्करोगाला कोलन कर्करोग किंवा गुदाशय कर्करोग म्हटले जाते. जगभरात आतड्याचा कर्करोग हा तिसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

तज्ञांच्या मते, ज्या लोकांना आतड्याचा कर्करोग होतो ती व्यक्ती साधारण ५ वर्षे जगण्याची केवळ ७०% शक्यता असते. आज आपण भाग १ मध्ये आतड्याच्या कर्करोगाची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊ. म्हणजे एखाद्या व्यक्तीस हा आजार झाल्यास त्याचे निदान वेळेत होण्यास मदत होईल. यामुळे योग्य वेळी उपचार घेतल्याने जगण्याची उमेद वाढेल.

आतड्याचा कर्करोग होण्याची कारणे

अनुवांशिक आणि कौटुंबिक इतिहास

इंफ्लेमेटरी बाउल डिजीज जसे की क्रोहन रोग

लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात वापरणे

पॉलिप्स

जास्त वजन किंवा लठ्ठ असणे

जास्त मद्यपान आणि धूम्रपान

आतड्याच्या कर्करोगाचे निदान

आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे

स्टूलमध्ये रक्त

पोटदुखी, पेटके, गोळा येणे

गुद्द्वार किंवा गुदाशय मध्ये वेदना

बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या बाउल हैबिट्समध्ये बदल

वजन कमी होणे

थकवा येणे

गुद्द्वार किंवा गुदाशय मध्ये गाठ

अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे

त्वचा पिवळी पडणे

श्वास लागणे

लघवीत रक्त येणे, वारंवार लघवी होणे

मूत्र रंगात बदल

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *