| |

भाग 1: शरीरातील ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता कसे ओळखालं?; जाणून घ्या लक्षणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे काही कमी प्रमाणात शरीराला प्राप्त होतात. यानंतर आपले शरीर आवश्यकता असणाऱ्या तत्वांबाबत आपल्याला संकेत देत असते. जसे कि लहान मुलांना भूक लागली कि लहान मुले आई ग.. भूक लागली असे सांगतात. आपल्या शरीराचेदेखील असेच असते. तुम्हाला माहित आहे का? आपल्या शरीरात व्हिटॅमिनची मात्रा योग्य प्रमाणात नसेल तर आपल्याला अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. यामध्ये सगळ्यात महत्वाचे असते ते ‘व्हिटॅमिन डी’. कारण या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे आपले शरीर अनेक व्याधी आणि आजारांचे घर होऊ शकते.

मुख्य म्हणजे व्हिटॅमिन डी हाडांच्या मेटाबॉलिज्मसाठी आवश्यक आहे आणि तेच मिळाले नाही तर कसे चालेल. याशिवाय व्हिटॅमिन डी हे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे जे अन्नातून शरीरात जाऊन तयार होते. ‘व्हिटॅमिन D’ चा उत्तम स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. पण तुमच्या शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता आहे हे ओळखण्यासाठी त्याची लक्षणे माहित असणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण भाग 1 मध्ये शरीरात ‘व्हिटॅमिन D’ची कमतरता असण्याची लक्षणे जाणून घेणार आहोत. तर भाग 2 मध्ये उपाय जाणून घेऊ.