| |

भाग 1: चक्कर येणे म्हणजे काय..? त्याची कारणे आणि लक्षणे कोणती.. ?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा पहिले असेल कि रस्त्यात एखादी व्यक्ती अचानक अस्थिर होऊन बेशुद्ध पडते. तिला चक्कर आली असे लोक बोलताना तुम्ही ऐकलेही असेल. विशेष करून असे प्रकार उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतात. यावेळी मस्तकावर पाणी टाकणे, कांदा फोडून नाकाला लावणे असे उपचार करताना लोक दिसतात. चक्कर येणे सगळ्यांना माहित आहे पण या स्थितीचा नेमका अर्थ किती लोक जाणतात..? शिवाय चक्कर येण्याची काही कारणे असू शकतात. जी माहित झाल्यास योग्य उपचार करता येतात. तसेच काही लक्षणांच्या आधारे आपल्याला चक्कर येत असल्याचे माणसाला आधीच समजते. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मित्रांनो जर वेळीच लक्षणे आणि करणे लक्षात आली तर योग्य उपाय करून हे त्रास टाळता येतात. त्यामुळे यांकडे दुर्लक्ष करू नये. चला तर आज आपण चक्कर म्हणजे काय हि स्थिती का निर्माण होते आणि याची लक्षणे कोणती हे भाग १ मध्ये जाणून घेऊया.

० ‘चक्कर येणे’ म्हणजे नेमकं काय..?

अचानक मनुष्याच्या शरीराचे संतुलन बिघडून तो खाली पडतो आणि क्वचित बेशुद्धावस्थेतही जातो. वेळीच उपचार न मिळाल्यास तो कोमात जाऊ शकतो वा मृत्युमुखीही पडु शकतो. ही, मानवी शरीराची एक निश्चित आपत्कालीन स्थिती दूर करण्यास व त्यास सामान्य स्थितीत आणण्यासाठी शरीराने केलेली प्रतिक्रिया असते. ज्याला ‘चक्कर येणे’ असे म्हणतात.

तर आयुर्वेदात चक्‍कर येणे या त्रासाला शिरोभ्रम असे म्हटलेले आढळते. चक्रस्थितस्येव संवेदनम्‌। असे भ्रमाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अर्थात चक्रावर बसून फिरल्याचा भास ज्या विकारात होतो त्याला ‘शिरोभ्रम’ म्हणतात. साधारण ८० वात विकारांपैकी हा एक विकार असल्याचे आयुर्वेद सांगते. तसेच मज्जाधातूत बिघाड झाल्यामुळेही भ्रम होऊ शकतो, असेही यात म्हटले आहे.

० चक्कर येण्याची कारणे कोणती..?

चक्‍कर येणे हे एक लक्षण आहे त्याची अनेक कारणे असू शकतात.
ती कारणे आपण जाणून घेऊयात खालीलप्रमाणे:-

1. भूक दुर्लक्षित होणे.
2. मानसिक ताणतणाव असणे.

3. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे.
4. उन्हाळ्यात उन्हाच्या झळा लागणे.
5. रक्तदाब पुष्कळ कमी होणे.
6. शरीरातून कोणत्याही कारणाने खूप रक्तस्त्राव होणे.
7. मेंदूस अचानक रक्तपुरवठा कमी वा बंद होणे.

० चक्कर येण्याची लक्षणे कोणती..?

चक्‍कर आली तर लगेच घाबरून जाण्याची गरज नसते. कारण चक्कर हि प्राथमिक स्थिती आहे जी एखाद्या आजराची वा शारीरिक स्थितीतील बिघाड दर्शवते. त्यामुळे वरील लक्षणे आणि कारणे वेळीच समजून घेऊन त्यावर उपाय करा. यानंतर भाग २ मध्ये आपण चक्कर येण्याच्या विविध स्थितींवरील उपाय जाणून घेऊ.