| |

भाग 1: ‘आमवात’ म्हणजे काय..?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुम्ही अनेकदा वृद्ध व्यक्तींच्या शरीराचा एखादा भाग अचानक वाकडा तिकडा होताना पाहिला असेल. अशावेळी त्या व्यक्तीला वेदनेने कळवळताना देखील पाहिले असेल. या स्थितीला वात येणे असे म्हणतात. यामध्ये आमवाताचा प्रकार अतिशय त्रासदायक असतो. आमवात (रूमेटाइड आर्थराइटीस) हा संधिवाताचा प्रकार आहे. यामूळे सांध्यांसह शरीराच्या अन्य अवयवांवरही वाईट परिणाम होतो.

डॉक्टरांच्या भाषेत आमवात हा ऑटोइम्यून आजार आहे. सर्वसाधारणपणे हा वाताचा प्रकार असल्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते आणि नंतर याचे तीव्र घातक परिणाम भोगावे लागतात. म्हणून आज आपण भाग १ मध्ये आमवात म्हणजे नक्की काय ते जाणून घेणार आहोत. यासोबत आपण आमवाताची लक्षणे आणि कारणे देखील जाणून घेऊया.

० आमवात म्हणजे काय?

आमवात म्हणजे आम व वात या दोन्ही दोषांमुळे होणारी सांधेदुखी. आपण सेवन केलेल्या आहारावर जठराग्नीची प्रक्रिया झाल्याने प्राकृत आहाररस तयार होतो. दरम्यान काही कारणास्तव अग्निमांद्य निर्माण झाले असता हा तयार होणारा आहाररस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतो. यामुळे शरीरात आमनिर्मिती होते. याचे रूपांतर ऊर्जेतही होत नाही आणि मलमार्गातून उत्सर्जित देखील होत नाही.

हा आम जड, चिकट, बुळबुळीत, तारयुक्त, दुर्गंधी, द्रव स्वरूपाचा असतो. हा आम सांध्यांमध्ये पोहोचल्यास सांधेदुखी वाढवतो. तर रक्तामध्ये साठल्यास रक्तातील चरबीचे प्रमाण वाढवतो. शिवाय रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास अवरोध निर्माण होतो आणि हृदयविकार होऊ शकतो. तसेच फुफ्फुसांमध्ये पोचला तर फायब्रॉसिससारखे आजार होतात. त्यामुळे वेळीच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

० आमवाताची लक्षणे

० आमवाताची प्रमुख कारणे

विरुद्ध आहार- विहाराचे सेवन

शिळे अन्नपदार्थ खाणे

अग्निमांद्य (पचनशक्ती मंदावणे)

अभिष्यंदी (दोषप्रकोपक) आहाराचे सेवन. उदा. दही, आंबवलेले पदार्थ इत्यादी

अति लंघन (अति उपवास) करणे

रात्री अति प्रमाणात जागरण (रात्रपाळी करणा-या व्यक्ती)

वातप्रकोपक आहारविहार

व्यायामाचा अभाव

दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे

यानंतर आपण भाग २ च्या माध्यमातून आमवातावर काय उपचार करता येतात ते जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश असेल.