Dragon Fruit
| | |

भाग 2: मुलांच्या विकासासाठी ड्रॅगन फ्रुट आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर पोषण असते जे मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यास सहाय्यक आहे. कारण या फळामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, अमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असते. शिवाय हिस्टिडाइन, लाइसिन, मेथिओनाइन आणि फेनिलॅलानिन या घटकांसह पोटॅशियम, फायबर आणि जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात. हे सर्व घटक लहान मुलांचा विकास करण्यास सहाय्यक आहेत. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटचे सेवन केल्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शिवाय मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि विविध आजारांपासून त्यांचे संरक्षण होते. त्यामुळे विविध रेसिपीजच्या माध्यमातून मुलांना ड्रॅगन फ्रुट खाऊ घाला.

Dragon Fruit

मुलांनी ड्रॅगन फ्रुट खाण्याचे फायदे:-

१) रोगप्रतिकारक शक्ती वाढते –

Immunity

ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटि ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या मात्रेत असते.यामुळे फ्री रॅडिकल्सच्या प्रभावापासून शरीराचे संरक्षण होते. यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर संसर्गमुक्त राहते. त्यामुळे मुलांच्या दैनंदिन आहारात ड्रॅगन फ्रुटचा समावेश आवश्यक आहे.

२) ॲनिमिया होत नाही –

Blood

ड्रॅगन फ्रूटमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. यामुळे हे फळ लहान मुलांनी खाल्ल्याने मुलांना अॅनिमिया होत नाही. ड्रॅगन फ्रुट लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते. सोबतच या फळाचे सेवन केल्यास जन्मजात समस्यांवरही मात करता येते.

३) हाडे मजबूत होतात –

मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांची हाडे मजबूत असणे गरजेचे आहे. यासाठी ड्रॅगन फ्रुट मदत करते. ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असल्यामुळे याचे सेवन केल्यास हाडांचा विकास होतो. शिवाय लहान मुलांनी याचे सेवन केल्यास मुलांना मुडदूस आणि सांधेदुखीची समस्या होत नाही. उलट त्यांच्या स्नायूंचा विकास होतो.

४) बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो –

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने मुलांची चयापचय क्रिया उत्तम राहते. यामुळे पचनक्रिया सुरळीत बरोबर राहते. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे मुलांना अपचन आणि गॅसची समस्या होत नाही. यासोबतच मुलांचे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.

५) बाळाच्या डोळ्यांसाठी फायदेशीर –

Eye Number

बाळाच्या निरोगी डोळ्यांसाठी आणि चांगल्या त्वचेसाठी ड्रॅगन फ्रूटमधील व्हिटॅमिन ए आणि फोलेट फायदेशीर आहे. ज्याच्या मदतीने त्यांचे डोळे आणि त्वचा निरोगी राहते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *