Food Poisoning
| | | |

भाग 2 : फूड पॉयझन झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एखाद्या दिवशी प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले तर काय होते..? किंवा मग बाहेरच अरबट चरबट खाऊन त्यावर दूध किंवा मग दही खाल्लं तर..? साहजिकच चुकीचे संयोजन आणि अनियंत्रित आहार दोन्ही पोटासाठी घातकच. यामुळे अनेकदा फुड पॉयझनिंगचा त्रास होतो.

Food Poison

आपण भाग १ मध्ये फूड पॉयझनिंग म्हणजे काय..? त्याची कारणे आणि लक्षणे कोणती..? हे जाणून घेतले. यानंतर आता आज भाग २ मध्ये आपण फूड पॉयझन झाल्यास घरच्या घरी कोणते उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ न घालवता लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० फूड पॉयझनवर घरगुती उपाय

१) पाणी पिणे –

फुड पॉयझनिंग झाल्यास शरीरातून पाणी कमी होते. परिणामी शरीरातून त्राण गेल्यासारखे वाटते. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर यासाठी भरपूर पाणी प्या.

Drinking Water

थोड्या थोड्यावेळाने जर तुम्ही थोडं थोडं पाणी प्याल तर शरीराला उर्जा मिळेल. शिवाय पाणी प्यायल्यामुळे शरीरातील मलदेखील बाहेर पडण्यास मदत होईल. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. यासाठी ताज्या फळांचा रसदेखील पिणे फायदेशीर आहे.

२) जिऱ्याचे पाणी –

फूड पॉयझनिंग दरम्यान असह्य पोटदुखी होत असेल आणि सतत मळमळ वाटत असेल तर जिऱ्याचे पाणी प्या. यासाठी जिरे हातावर चोळून जरा हलके भाजून घ्या. आता हे जिरे पाण्यात घाला आणि ते पाणी जिऱ्यासकट प्या. यामुळे आराम मिळेल.

३) केळ –

Banana

केळ्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर हे दोन्ही पोटासाठी फायदेशीर असणारे घटक असतात. त्यामुळे पोटदुखी कमी होण्यासाठी मदत मिळते. यासाठी फुड पॉयझनिंग झाल्यास केळ्याचे विविध प्रकारे सेवन करणे कधीही चांगले मानले जाते.

४) पुदिना –

पुदिनादेखील फूड पॉयझनिंग झाल्यास फायदेशीर भूमिका बजावतो. यासाठी पुदिन्याची काही पाने घेऊन ती स्वच्छ धुवून वाटून घ्या. आता पुदिन्याची तयार पेस्ट पाण्यात मिसळा आणि हे पाणी प्या. यामुळे पोटाला आराम मिळण्यास मदत मिळेल.

५) सफरचंद –

apple

सफरचंद कोणत्याही आजारात फायदेशीर मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला फूड पॉयझनिंगचा त्रास झाला असेल तर इतर कोणतेही पदार्थ खाण्याऐवजी सफरचंदाचे सेवन करावे. यामुळे आराम मिळण्यास मदत होईल.