Itching
| | |

भाग 2: अंगाला खाज येण्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंगाला खाज सुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. भाग १ मध्येच ती सर्व कारणे आपण जाणून घेतली. यानंतर आता भाग २ मध्ये आपण अंगाला खाज येण्यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने आपण या समस्येतून लवकर आराम मिळवू शकतो.

१) नारळाचे तेल

० फायदा – कोरड्या त्वचेला जास्त खाजेचा त्रास होतो. त्यामुळे कोरड्या त्वचेवर जर नारळाचे तेल लावले तर त्वचा नैसर्गिकरित्या कोमल आणि मुलायम राहते. परिणामी खाज येत नाही आणि येत असेल तर थांबते.

२) तुळस

० फायदा – तुळस अत्यंत गुणकारी औषधी आहे. यातील अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म त्वचेचे रक्षण करतात. यामुळे अंगाला खाज येत असेल तर तुळशीचा वापर गुणकारी ठरतो.

३) कडुलिंबाची पाने

० फायदा – कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटि बॅक्टेरियल आणि अँटि फंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचेची खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.

४) कोरफड जेल

० फायदा – कोरफडमध्ये मॉईस्चराईजिंग आणि अँटिएजिंग गुणधर्म असतात. यामुळे कोरडी त्वचा तसेच वाढत्या वयामुळे अंगाला येणारी खाज दूर होते.

५) पेपरमिंट ऑईल

० फायदा – पेपरमिंट ऑईल हायब्रिड पुदिन्यापासून तयार केले जाते. हे इसेन्शियल ऑईल आहे. यामुळे खाज- खुजलीच्या समस्यांवर पेपरमिंट ऑइल अत्यंत गुणकारी आहे.

६) मध

० फायदा – मधातील अँटि मायक्रोबियल आणि अँटि इन्फ्लेमेटरी गुण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वचेवरील सूज आणि खाज कमी कारण्यासाठी मध प्रभावी ठरते.

७) मेथी दाणे

० फायदा – त्वचेसंबंधित समस्यांवर मेथी दाणे उपयुक्त आहेत. कारण मेथी दाण्यात असलेल्या मेथेनॉलिक अर्कमध्ये अँटि इन्फ्लेमेटरी गुण असतात. यामुळे त्वचेवर खाज येणायची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

८) लिंबाचा रस

० फायदा – लिंबामध्ये अँटि एजिंग गुण असतात. हे वाढत्या वयानुसार त्वचेवर येणाऱ्या खाजेच्या त्रासासाठी उपयुक्त असतात. तसेच लिंबातील विटामिन सी हे त्वचेवरील खाज आणि सूज यांसारख्या समस्येवर गुणकारी आहेत.

९) बेकिंग सोडा

० फायदा – अंगावर खाज येत असेल तर बेकिंग सोड्याचा उपयोग करणे उत्तम आहे.कारण बेकिंग सोडायुक्त पाण्याने आंघोळ केल्यास, खाज येणे खूप लवकर बंद होते आणि आराम मिळतो.

१०) अॅप्पल साईड व्हिनेगर

० फायदा – खाजेमुळे नसांमध्ये सूज आणि त्वचेवर रॅशेस येतात. हे घालवण्यासाठी अॅप्पल साईड व्हिनेगरचा वापर उपयुक्त आहे. यामुळे नसांची सूज पटकन कमी होते आणि खाज थांबते.

० अत्यंत महत्वाचे – वरील कोणत्याही उपायाने खाज थांबली नाही तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निदान करून घ्या.