Home Remedies For stomach Worms
| |

भाग 2: पोटात जंत झाल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जंताचा त्रास हा वाळवीसारखा असतो. ज्या व्यक्तीला जंताचा त्रास होतो त्याला सतत पोटदुखी, पोटफुगी, अशक्तपणा, मळमळणे असे त्रास जाणवतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेकदा हा आजार काही औषधोपचारांनी बरा झाल्याचे निदर्शनास येते. मात्र हा आजार सहज पाठ सोडत नाही. त्यामुळे औषधे घेऊन आराम पडल्यानंतर लगेच औषधे बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांत बदल करून घ्या.

याशिवाय काही घरगुती उपाय देखील आहेत जे जंतांच्या त्रासावर अत्यंत परिणामकारक आहेत. त्यामुळे जंत झाल्याचे लक्षात येताच हे उपाय करा. यामुळे जंताचा त्रास वाढणार नाही. आपण भाग १ मध्ये जंत म्हणजे काय आणि त्याची लक्षणे जाणून घेतली. यानंतर आता भाग २ मध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

० पोटातील जंतावर घरगुती उपाय:-

१) कडुनिंबाचे चूर्ण
कडूनिंबाची पाने पोटातील जंत होण्याच्या समस्येवर प्रभावी आहेत. त्यामुळे जंत झाल्यास कडुनिंबाचे चूर्ण आणि मध एकत्र करुन त्याचे चाटण करुन प्या. यामुळे शौचावाटे जंत मरून पडून जातील आणि पोटदुखीपासून त्वरित आराम मिळेल.

२) कारल्याची पाने
कारले चवीला कडू असली तरीही पोटात जंत झाल्यास अतिशय प्रभावी आहेत. इतरही अनेक फायद्यासाठी कारले खाणे फायदेशीर आहे. पण पोटात जंत झाल्यास कारल्याची पाने मदतयुक्त ठरतात. यासाठी कारल्याच्या पानांमध्ये मध घालून त्याचे चाटण बनवून घ्या. यामुळे पोटातील जंत मरून शौचावाटे पडून जातात आणि आराम मिळतो.

३) शेवग्याच्या शेंगा
शेवग्याच्या शेंगा या चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक पर्याय आहेत. पोटात जंत झाल्यास शेवग्याच्या शेंगा उपायकारक ठरतात. यासाठी शेवग्याच्या शेंगा उकडून त्याच्या पाण्यात मीठ आणि मिरपूड घालून प्या. यामुळे पोटातील जंतांची वाढ थांबते आणि जंत कमी होण्यास मदत मिळते.

४) डाळिंबाचे साल
डाळिंब गुणकारी फळांपैकी एक असून त्याची साल अत्यंत आयुर्वेदिक आहे. जंतांच्या त्रासावर डाळिंबाची हीच गुणकारी साल उत्तम उपाय ठरते. रस्ताही डाळिंबाच्या सालीला उन्हात कडक सुकवून घ्या आणि त्याची पूड करा. जंत झाल्यास हि पूड १ छोटा चमचा दिवसातून एकवेळ अशीच किंवा पाण्यात मिसळून याचे सेवन केल्यामुळे जंताचा त्रास खूप लवकर कमी होतो.

५) बाळंतशेप चूर्ण
बाळंतशेप चूर्ण हे कोणत्याही वयातील व्यक्तीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय पोटात जंत झालया हे बाळंतशेप चूर्ण अत्यंत परिणामकारक ठरते. यासाठी जेवणानंतर ताकामध्ये बाळंतशेप चूर्ण आणि बडीशेप चूर्ण एकत्र मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे पोटातील जंत मरण्यास मदत होते आणि लवकर आराम मिळतो.