Weight Gain During Menstruation
| | |

भाग 2: मासिक पाळीच्या काळात किती वजन वाढतं..? ते नियंत्रित कसे ठेवालं..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मासिक पाळीच्या काळात वजन वाढणं हि अतिशय सामान्य बाब आहे. याची कारणे मात्र विविध असू शकतात. हि कारणे आपण भाग १ मध्ये जाणून घेतली. यानंतर आता भाग २ मध्ये आपण मासिक पाळीच्या काळात साधारण किती वजन वाढते ते जाणून घेणार आहोत. याशिवाय मासिक पाळीच्या काळात वाढलेले वजन नियंत्रित कसे ठेवता येईल हेदेखील जाणून घेऊ.

० मासिक पाळीच्या काळात किती वजन वाढतं..?

मासिक पाळीच्या काही दिवस आधी आणि मासिक पाळीत तसेच मासिक पाळी येऊन गेल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवस अंग जड जाड वाटू लागते. म्हणजेत आपले वजन वाढल्यासारखे वाटते. पण मासिक पाळी येऊन गेली कि आठवड्याभरातच ते नैसर्गिकपणे कमीही होत जाते. या दरम्यान साधारणत: २ ते ३ किलो वजन वाढणं ही सामान्य बाब असल्याचे मानले जाते. तज्ज्ञ म्हणतात या काळात वाढणाऱ्या वजनाची काळजी करु नये. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास या काळात वाढणाऱ्या वजनाचे दीर्घकालीन परिणाम होत नाही. 

० मासिक पाळीत वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे..?

मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण साठून राहते. त्यामुळे आपोआप वजन वाढतं असं तज्ञ सांगतात. त्यामुळे पाणी कमी पिणे हा उपाय असू शकत नाही. तर तज्ञांच्या मते मासिक पाळीदरम्यान पुरेसे पाणी प्यावे. यामुळे सतत खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय शरीराला पुरेसे पाणी मिळते आणि शरीरात ऊर्जा कायम राहते.

मासिक पाळीच्या दिवसात पचन क्रियेवर होणार नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी आहारात नियमितपणे फायबरयुक्त पदार्थ खावे.

Fry Food

मासिक पाळीच्या काळात पोटाच्या समस्येत वाढ होऊ नये यासाठी मीठ, साखर, तळलेले पदार्थ, आंबट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंकफूड खाणे टाळावे.

मासिक पाळीत शरीराची हालचाल केल्यास त्रास होतो असा एक समज असल्यामुळे व्यायाम आणि हालचाल बंद करू नये. यामुळे जडत्त्व येतं. हे टाळण्यासाठी मासिक पाळीतही पुरेसा आणि आरामदायी व्यायाम करा. मासिक पाळीच्या काळात उत्साही वाटण्यासाठी हलका फुलका व्यायाम करणे आवश्यक आहे.

मासिक पाळीदरम्यान कंटाळा येणे, शारीरिक थकवा जाणवणे आणि मूड चिडचिडा राहणे स्वाभाविक आहे. पण म्हणून सतत कॅफीनयुक्त चहा काॅफी जास्त पिऊ नये. यामुळे वजन वाढतं. म्हणून चहा असो वा काॅफी याचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे.