Chest Pain
| | |

भाग 2: छातीची उजवी बाजू दुखत असेल तर करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। छातीत फक्त उजव्या बाजूला दुखत असेल तर हे हृदयाशी संबंधित विकार वा हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असेलच असे नाही. म्हणूनच आपण अचानक उजव्या बाजूला छातीत दुखण्याची नेमकी कारणे काय हे भाग १ मध्ये जाणून घेतले. मात्र छातीत कसेही दुखणे हे अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे. त्यामुळे आज आपण भाग २ मध्ये छातीत उजव्या बाजूला दुखत असेल तर कोणते उपाय करता येतील हे जाणून घेऊया.

> छातीची उजवी बाजू दुखत असेल करावयाचे उपाय

1. तुळस – तुळशीमध्ये व्हिटॅमिन के आणि मॅग्नेशियम असते. यामुळे हृदयाच्या आसपासच्या कोणत्याही वेदनांपासून आराम देण्यासाठी तुळस सक्षम आहे. म्हणून छातीत उजव्या बाजूला दुखत असेल तर तुळशीची ८ ते १० पाने स्वच्छ धुवून चावून खावी. यामुळे आराम मिळेल. शिवाय तुळस पानांच्या १ चमचा रसात थोडे मध मिसळून प्या. यामुळेही त्वरित आराम मिळतो.

Termeric Milk

2. हळदीचे दूध – हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत मिळते. शिवाय हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन छातीची सूज किंवा जळजळ दूर करण्यास प्रभावी आहे. त्यामुळे छातीत उजव्या बाजूला वेदना होत असतील तर हळदीचे दूध प्या. हे दूध तुम्ही दिवसभरात एकदा वा रात्री झोपण्यापूर्वी प्या

3. कोरफड – कोरफड अत्यंत आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा रस पिणे आरोग्यदायी आहे. यामुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखता येते. उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. याशिवाय छातीत जळजळ वा वेदना होत असतील तर दूर होतात. म्हणूनच छातीत उजव्या बाजूला वेदना होण्याची समस्या जाणवत असतील तर दररोज १/४ कप कोरफडीचा रस प्या.

4. ओवा आणि मीठ – बहुतेकदा छातीची उजवी बाजू अर्थात हृदयाच्या उजव्या बाजूला होणाऱ्या वेदनांचे कारण पोटदुखी, बद्धकोष्ठता, पोटात पेटके वा गॅसची समस्या हे असते. अशावेळी या प[प्रत्येक समस्येवर मात करण्यासाठी ओवा आणि मिठाचे सेवन करणे फायदेशीर आहे. यासाठी साधारण १ चमचाभर ओवा तव्यावर व्यवस्थित भाजून त्यावर मीठ शिंपडा आणि न चावता खाऊन त्यावर पाणी प्या. यामुळे काही वेळातच वेदना दूर होतील.

5. आलं आणि लसूण – छाती, हृदय आणि पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर आल्यासोबत लसूणचे सेवन फायदेशीर ठरते. छातीची उजवी बाजू कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे दुखत असेल तर आल्याचा कडक चहा प्या वा कच्चे आले खा. याशिवाय लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहतो. त्यामुळे लसणाचा भुरका किंवा कच्चा लसूण खाणे फायदेशीर ठरेल. तसेच लसूण आणि आले प्रत्येकी १ चमचा एकत्र मिसळून खाल्ल्यानेही लाभ होतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *