Alopecia
| | |

भाग 2 : ॲलोपेशिया झाल्यास काय उपचार करावे..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ॲलोपेशिया हा एक असा विकार आहे ज्याचं थेट संबंध सौंदर्याशी येतो. जिवाहून प्यारे असणारे केस नुसते गळू लागले तरीही कित्येकांचा जीव वर खाली होतो. पण या आजारामुळे नुसते केस गळत नाहीत तर डोक्यावर विविध ठिकाणी चाई पडू लागते. अर्थात विविध भागावर टक्कल पडू लागत. परिणामी अन्य केसांच्या मुळांवरही याचा मोठा परिणाम होतो आणि हळूहळू संपूर्ण स्कॅल्पवर टक्कल दिसून येते.

Alopecia

या विकारामध्ये ठराविक भागातले सर्व केस गळून त्या ठिकाणी छोटे गोलाकार पॅचेस तयार होतात. याला ‘ॲलोपेशिया ॲरियाटा’ असे म्हणतात. तर संपूर्ण टाळूवरचे केस गळण्याच्या स्थितीला ‘ॲलोपेशिया टोटॅलिस’ म्हणतात. हा विकार २० ते ४० वयोगटाच्या तरुणांमध्ये आढळून येत आहे. त्यामुळे याबाबत सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे.

यामुळे आपण भाग १ मध्ये ॲलोपेशिया म्हणजे काय..? त्याची कारणे कोणती..? त्याची लक्षणे काय..? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. यानंतर आता आपण भाग २ मध्ये या ॲलोपेशिया वर कोणते उपचार करता येतील हे जाणून घेणार आहोत.

० ‘ॲलोपेशिया’वरील उपचार

ॲलोपेशिया या विकारावर कोणतेही उपचार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा विकार नक्की कोणत्या प्रकारचा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी टाळूवरील केस किती प्रमाणात गळत आहेत, त्यांचा दर्जा काय आहे, स्कॅल्पची स्थिती काय आहे हे जाणून घेणे आवश्यक असते. कारण यावरून डॉक्टर उपचारांची दिशा ठरवतात.

Alopecia

यात जर ॲलोपेशिया ॲरियाटा या विकारामुळे केस गळत असतील, तर काही केसेस मध्ये ते केस परत येण्याची शक्यता असते.
मात्र ॲलोपेशिया टोटॅलिस या विकारामध्ये असे होत नाही. अशा रुग्णांना स्टिरॉइड क्रीम्स दिल्या जातात. पण हा उपाय ५०% पेक्षा जास्त केसगळती असेल त्याच रुग्णांना सुचवला जातो.

Alopecia

तसेच ५०% पेक्षा कमी केस गळत असतील, तर अनेकदा प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो. काही महिन्यात किंवा वर्षभरात अनेक जणांचे केस परत नव्याने येतात. या व्यतिरिक्त स्टिरॉइड इंजेक्शन्स आणि लाईट थेरपीज हे उपाय अवलंबले जातात.

Alopecia

दरम्यान ॲलोपेशिया हा विकार सौंदर्याशी संबंधित असल्यामुळे टीका टिप्पणी होऊ लागतात. याचा परिणाम थेट मानसिक स्थैर्यावर होतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ॲलोपेशियाच्या अन्य थेरेपी उपचारांबरोबरच कौन्सिलिंग आणि सायकोलॉजिकल थेरपीचाही अवलंब केला जातो. याचं कारण म्हणजे केस गळती आणि मानसिक ताणतणाव यांचं दुष्टचक्र आहे. ते थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी उपचार करणे आवश्यक असते.