Eating Disorder
| | |

भाग 3 : ‘इटिंग डिसऑर्डर’ झाल्यास काय उपचार कराल?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। इटिंग डिसऑर्डर म्हणजेच खाण्याचा विकार. यामुळे माणसाच्या स्वभावात अचानक होणारे बदल आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे सामाजिक, मानसिक आणि जैविक घटकांवर परिणाम होत असतो. आपण भाग १ मध्ये इटिंग डिसऑर्डर म्हणजे काय? त्याचे प्रकार किती आणि कोणते ते जाणून घेतले. यानंतर भाग २ मध्ये इटिंग डिसऑर्डर होण्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेतली. यानंतर आज भाग ३ मध्ये आपण इटिंग डिसऑर्डर झाल्यास कोणते उपचार करावे ते जाणून घेणार आहोत.

Eating Disorder

० तुम्हालाही इटिंग डिसऑर्डर असेल तर…

बर्‍याच लोकांना खानपानाची समस्या असते आणि ही काही मोठी गोष्ट नाही. जर तुम्हालाही इटिंग डिसऑर्रडरची समस्या असेल तर डॉक्टरांकडे जा. लक्षात ठेवा, डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही या आजारातून बाहेर पडू शकता. डॉक्टरांची मदत घेणे खूप महत्वाचे आहे. सुरुवातीला तुम्हाला या आजारातून बाहेर पडणे कठीण होऊ शकते. 
परंतु उपचारानंतर, तुमचा आहाराबद्दल सकारात्मक दृष्टीकोन विकसित होईल, ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल.

० इटिंग डिसऑर्डरवर असे करा उपचार

खाण्याच्या विकाराच्या समस्येवर अनेक उपचार आणि थेरपी उपलब्ध आहेत. परंतु हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे की, प्रत्येक रुग्णाच्या समस्यामध्ये मोठा फरक असतो. शिवाय, हा आजार रुग्णाला मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या प्रभावित करतो. त्यामुळे या आजाराच्या   उपचारासाठी औषधांसोबतच डॉक्टर कधी ध्यान तर कधी योगासनेही सुचवतात. या आजाराने  त्रस्त असलेल्या रुग्णाला कुटुंब आणि मित्रांकडून मानसिक आणि भावनिक आधाराचीही     गरज असते. त्यामुळे रुग्ण जरी चिडचिडा झाला तरी कुटुंब आणि मित्रांनी त्याच्यासोबत राहावे.