Clove
| | | |

भाग 3 : दैनंदिन जीवनात लवंगचा वापर कुठे आणि कसा करावा..?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दैनंदिन जीवनात रोज रोज तेच तेच खाण्याचा कंटाळा कुणाला येत नाही..? मग कधीतरी काहीतरी चटपटीत आणि पटकन होईल असं बनवायचं मन झालंच तर सगळ्यात आधी सुचणारा पदार्थ म्हणजे पुलाव. आता पुलाव बनवायचा म्हणजे खडा मसाला आला आणि खडा मसाला आला म्हणजे १००% लवंगेचा वापर आलाच. पण लवंग फक्त पुलाव पुरता मर्यादित आहे का..? तर नाही. इतरही अनेक पदार्थ वा आरोग्यदायी फायद्यांसाठी इतर अनेक पद्धतींनी तिचा वापर करता येतो. तो कसा हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण भाग १ मध्ये आयुर्वेदानुसार लवंग आरोग्यासाठी कशी आणि का फायदेशीर असते हे जाणून घेतले. यानंतर भाग २ मध्ये आपण लवंग खाण्याचे फायदे जाणून घेतले. यानंतर आज आपण भाग ३ मध्ये लवंगेचा दैनंदिन जीवनात कसा वापर करावा हे जाणून घेणार आहोत. यानंतर भाग ४ मध्ये लवंगेचा अतिवापर केल्यास होणारे नुकसानही जाणून घेऊ.

० लवंगेचा दैनंदिन जीवनात असा करा वापर

1. जेवण बनविताना जेवणाची चव आणि सुगंध यासाठी लवंगचा वापर करावा. यासाठी पदार्थाच्या मात्रेप्रमाणे किमान २ ते ४ लवंग पुरेशा प्रमाणात वापराव्या.

2. फ्लेवरिंग एजंट स्वरूपात लवंगेचा भारतीय मसाला, लोणची आणि सॉसमध्ये वापर करता येतो, यासाठी पदार्थाच्या गुणवत्तेनुसार प्रमाण ठरवावे.

3. ब्लॅक टी मध्ये १ लवंग टाकून याचे सेवन करा. असे नियमित केल्या कितीही जुनाट सर्दी असो किंवा मग कफ वा खोकला लगेच बरा होऊ शकतो.

4. लवंगेच्या तेलाचे काही थेंब घेऊन कपाळावर मसाज करा. यामुळे तणावमुक्त होण्यास मदत मिळेल.

5. घश्यात झालेले संक्रमण आणि सूज कमी करण्यासाठी १ ग्लास गरम पाण्यात १ लहान चमचा लवंग चूर्ण मिसळून गुळण्या करा. लगेच आराम मिळेल.

6. फक्त १ कप गरम पाण्यात १/४ चमचा लवंग पावडर मिसळा आणि नियमित सकाळी आणि रात्री प्या. असे केल्यास तुमचे वजन कमी करण्यास मदत मिळते.

7. श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर आहे. यासाठी तोंडात एक लवंग चघळा.

8. लवंग पाण्यात उकळून घ्या आणि या पाण्याचा वापर माऊथवॉश म्हणून करा. यामुळे तोंडातील बॅक्टरीया दूर होतील.

9. हिरड्या दुखत असतील आणि सूज आली असेल तर लवंगेच्या तेलाचे काही थेंब त्याठिकाणी लावून हळूहळू मसाज करा. यामुळे दुखणे कमी होऊन आराम मिळेल.

10. दात दुखत असल्यास जो दात दुखतोय त्या दाताखाली लवंग ठेवा. तुमची दातदुखी अगदी थोड्याच वेळात कमी होईल

11. लवंगचे गुण आणि सुगंध यामुळे त्याचा उपयोग अरोमा थेरपीसाठी करता येतो.