Pesticides and human health

कीटकनाशके आणि मानवी आरोग्य

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या आहारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचा समावेश असतो. आपल्या आरोग्यासाठी भाज्या आणि फळे असणे फार आवश्यक आहे. कारण वेगवेगळी जीवनसत्वे हि आपल्याला फळांपासून मिळतात. फळे हि लहानापासून ते मोठ्या लोकांपर्यत सगळ्याच्या आहाराचा एक भाग आहे. सगळे जण फळांचा आहारात समावेश करतात. पण तुम्ही वापरत असलेल्या फळांमध्ये किती प्रमाणात औषधांचा वापर हा केला जातो. किती प्रमाणात कीटकनाशके असतात. ते आपल्या आरोग्यास कसे धोकादायक आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …

कीटकनाशकांचे आरोग्यावर बरेच परिणाम होऊ शकतात. ते श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून ते कर्करोगापर्यंतच्या अनेक गंभीर आजार आणि आजारांशी संबंधित आहेत. कीटकनाशकांचा संपर्क अनेक प्रकारे उद्भवू शकतो. बेकरी प्रोडक्ट, डबाबंद खाद्यपदार्थ, झाडे व धान्य दुकानांच्या व शेतीमधील कीटकनाशकांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. आपल्या घरात येणार भाजीपाला मध्ये सुद्धा खूप प्रकारची औषधे वापरली जातात. गावात आणि शहरांमध्ये उद्याने, फुटपाथ आणि क्रीडांगणे यासारख्या ठिकाणी फवारणीद्वारे कीटकनाशकांचा धोका आहे. बरेच लोक घर व बागेत वापरण्यासाठी कीटकनाशके खरेदी करतात. व कळत न कळत त्याचा आपल्या आजारावर परिणाम होतो.

आजकाल शेतीचे उत्पन्न हे जास्त व्हावे यासाठी शेतात वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी केली जाते. कीटकनाशकांचा प्रभाव हा सरळ आपल्या आरोग्यावर जाणवतो. बाजारात मिळणारी सगळी फळे किंवा भाजीपाला यामध्ये काहीसा कीटकनाशकांचा अंश हा असतोच त्यामुळे कोणतीही भाजी किंवा फळे वापरत असताना ती स्वच्छ धुणे फार गरजेचे आहे . त्यापासून वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्याच्या मुळे श्वसनाच्या समस्या या जास्त जाणवतात. त्वचेचे विकार सुद्धा खूप जाणवतात. घसा खवखवणे आणि खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते .