| |

थंडीमध्ये गुलाबी ओठांचा रंग झाला काळा? तर करा ‘हे’ घरगुती उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर आणि आकर्षक ओठांची ओळख म्हणजे त्यांचा गुलाबी रंग. सर्वसाधारणपणे गुलाबी रंगाचे ओठ हे अतिशय लक्षवेधी असतात. त्यामुळे प्रत्येक मुलीला आपले ओठ असेच हलके गुलाबी अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखे असावे असे वाटते. पण हिवाळ्याच्या दिवसात या गुलाबाच्या पाकळ्या जणू कोमेजून जातात. याचे कारण म्हणजे थंडी. थंडीमुळे ओठांचा रंग बदलतो. शिवाय ओठ निस्तेज आणि खडबडीत होतात. थंडीच्या दिवसात ओठ फाटण्याची समस्या देखील जाणवते. अशा प्रत्येक समस्येवर काही ना काही घरगुती उपाय असतातच. फक्त ते करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या ओठांचा बदललेला रंग जाणवत असेल आणि तुम्ही तुमच्या गुलाबी ओठांना मिस करत असालं तर आम्ही तुम्हाला आज जे घरगुती उपाय सांगणार आहोत ते जरूर करून पहा. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) बीटरूट ज्युस – यासाठी बीटाचा रस काढून घ्या आणि नुसता रस ओठांना लावून ओठांचा मसाज करा किंवा यामध्ये मध घालून ओठांना लावा. यामुळे अगदी काहीच दिवसात ओठ गुलाबी होतील. कारण बीट नैसर्गिक एक्स्फोलिएटर आहेत.
– बीटाचा रस कधीही वापरता येईल. पण योग्य परिणाम हवे असतील तर झोपण्याआधी ओठाला बीटाचा रस लावा आणि रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर गार पाण्याने ओठ धुवा.

२) लिंंबाचा रस – लिंबाचा रस काळ्या ओठांसाठी लाभदायी आहे. यासाठी लिंबाच्या रसाचे २-३ थेंब ओठावर लाऊन मसाज करा. याचा परिणाम म्हणजे ओठांचा काळेपणा कमी होतो आणि ओठ मुलायम होतात.
– रात्री झोपताना लिंबाचा रस ओठांना लावून ठेवा. यानंतर १/२ तासाने ओठ स्वच्छ करा. हा रस तुम्ही रात्रभरही ओठांवर ठेवू शकता. पण याचा जास्त वापर करू नका.

३) केशर आणि दही पॅक – केशराचे २-३ धागे दह्यात १५-२० मिनिट राहू द्या. यानंतर तयार पॅक मुलायमपणे ओठांना लावून मसाज करा.
– दिवसभरात कधीही या पॅकचा वापर करू शकता. फक्त हे लावल्यानंतर कोणत्याही प्रकारे तणावात राहू नका. तर याचा परिणाम लगेच मिळेल.

४) बटाट्याचा रस – ओठाचा काळेपणा दूर करण्यासाठी बटाट्याचा रस रोज ओठाला लावा. बटाट्यातील एक्सफोलिएट घटक ओठांचा काळेपणा दूर करून ओठांची चमक परत आणतात.
– कोणत्याही वेळी तुम्ही बटाट्याचा रस वापरू शकता. फक्त रस काढून ठेवू नका.

५) गुलाबाच्या पाकळ्या – गुलाबी रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या दुधात मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट ओठावर लावून ठेवा. यातील दूध ओठांचा काळेपणा दूर करेल आणि गुलाबाच्या पाकळ्या ओठ गुलाबी आणि आकर्षक बनवतील.
– संपूर्ण दिवसात तुमच्या सोयीने याचा वापर करा. शक्यतो रात्री झोपताना याचा वापर करा.

६) डाळिंबाचे दाणे – साधारण १ चमचा डाळिंबाचे लाल दाणे वाटून घ्या आणि यात २ चमचे दूध मिसळा. आता तयार पेस्ट ओठांवर स्क्रबसारखी वापरा. यामुळे ओठांवरील डेड स्किन दूर होईल आणि ओठांचा नैसर्गिक रंग परत येईल.
– याचा वापर तुम्ही कधीही आणि कोणत्याही वेळी करू शकता.