| | |

निवांत झोपेसाठी पायाखाली कांदा ठेवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कांद्याविना अनेकांची बोंबाबोंब होते यात काही नवे नाही. त्यात कांद्याचे दर वाढले कि सगळेच घाईला येतात. असा हा कांदा पांढरा असो नाहीतर लाल तो जेवणाची चव वाढविण्यासाठी अतिशय लाभदायक असतो. अनेकांना कांदा असाच कच्चा खायला देखील आवडतो. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? कांदा जेवणाची चव वाढवतो, इतर गुणकारी लाभ देतो आणि याशिवाय आणखी एक आश्चर्यचकित करणारा फायदा देतो. हा फायदा म्हणजे निवांत आणि शांत अशी गाढ झोप. होय . तुम्ही बरोबर वाचताय. कांद्यामुळे गाढ झोप लागते. पण यासाठी काय कराल? तर यासाठी फार काही करण्याची गरज नाही. फक्त रात्री झोपताना आपल्या सॉक्समध्ये कांद्याची एखादी पात, कापलेली चकती किंवा अर्धा कांदा आपल्या सोयीनुसार ठेवा. यामुळे कांद्यातील पोषकतत्व थेट आपल्या त्वचेत जातात आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

तळपायात शरीराच्या वेगवेगळ्या पेशी जुळलेल्या असतात. या पेशी आपल्या शरीरातील आंतरक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी सहाय्यक असतात. अशात कांदा सॉक्समध्ये ठेवून झोपल्याने तळपायातील पेशी जागृत होतात. या सक्रिय पेशी आपल्या शरीराची काळजी घेण्यास सक्षम असतात. चला तर जाणून घेऊया कांदा पायाखाली ठेवून झोपल्याने शरीराला काय फायदे होतात.

१) बॅक्टेरिया – तळपाय हा आपल्या शरीराचा शिरोबिंदू मानला जातो. त्यामुळे कांद्याची एखादी पातळ चकती तळपायांवर लावून झोपल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात आणि पायांची काळजी घेतली जाते.

२) शुद्ध रक्त – कांद्यामध्ये फॉस्फोरिक अ‍ॅसिड असल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यासाठी कांदा मदत करतो. कांडा कापल्यानंतर हे ऍसिड सक्रिय होते आणि तळव्याच्या माध्यमातून ते शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते.

३) रक्ताभिसरण – कांद्यातील काही विशेष घटक हे आपल्या शरीरातील रक्ताच्या पेशींना चालना देतात. यामुळे संपूर्ण शरीरातील अवयवांपर्यंत रक्त व्यवस्थित पोहचते.

४) पेशींची सक्रियता – कांद्यामध्ये समाविष्ट असणारे बॅक्टेरिया नाशक घटक कांदा कापल्यामुळे त्यातून निघणाऱ्या स्रावातून सक्रिय झालेले असतात. हे घटक शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या बॅक्टेरियाचा नाश करतात. परिणामी पेशींच्या कार्यातील सक्रियता कायम राहते.

५) शारीरिक ऊर्जा संग्रह – कांद्यामध्ये फॉस्फरस सारखे घटक असतात. जे डोळ्यांच्या पडद्यासाठी झोंबणारे असले तरीही शारीरिक ऊर्जा संग्रहित आकारण्याची लाभदायक असतात.

६) शुद्ध हवा – रात्री रूममध्ये कांदा कापून ठेवल्यास रुममधील हवादेखील शुद्ध होते. यामुळे श्वासासंबंधित कोणतेही त्रास असल्यास दूर होतात.