| |

बटाट्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर; कसा? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बटाटा चवीला फार चविष्ट असल्यामुळे अनेकांची आवडती भाजी म्हणून ओळखला जातो. पण अनेकदा बटाटे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत अशी एक विशेष समजूत आहे. साहजिकच यात तथ्य आहे. पण तुम्हाला वाटतो तितका काही बटाटा आरोग्याचे नुकसान करत नाही. उलट काही अंशी बटाटा आरोग्यदायी आहे. पण याबाबत आपल्यापैकी फार कमी लोक जाणतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नेहमीच धोकादायक असतो. त्याचप्रमाणे बटाट्याचे आहे. याचे सेवन अधिक कराल तर धोका निश्चित पण प्रमाणात कराल तर फायदे निश्चित. चला तर जाणून घेऊयात बटाट्याच्या रसामुळे होणारे फायदे. इतकेच नव्हे तर तो कसा बनवायचा आणि त्यात कोणकोणते गुणधर्म समाविष्ट आहेत हे दखल आपण जाणून घेणार आहोत.

० बटाट्याचा रस कसा बनवायचा?
– बटाट्याचा रस बनविणे अगदी सोप्पे आहे. यासाठी तुम्हाला ५ मध्यम आकाराचे बटाटे सोलून घेऊन त्याचे लहान चौकोनी तुकडे करायचे आहे. यानंतर बातात्याचे तुकडे ज्युसरमध्ये ग्राइंड करून बटाट्याचा ताजा रस काढा. हा रस ताजाच सर्व्ह करा. त्यामध्ये काहीही आणि कोणतेही मसाले मिसळू नका.

० बटाट्याच्या रसात कोणते गुणधर्म आढळतात?
– बटाट्याचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ञांच्या मते, यात जीवनसत्त्वे बी आणि सी, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि तांबे यांची समृद्धता आहे.

० बटाटयाच्या रसाचे आरोग्यवर्धक फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
– बटाटयाच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते. परिणामी सर्दी आणि संक्रमणाशी लढण्यास आपल्याला सहाय्य मिळते. यासाठी रिकाम्या पोटी १ ग्लास बटाट्याचा रस पिणे फायदेशीर आहे.

२) अल्सरपासून आराम मिळतो.
– बटाट्याचा रस गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ओळखला जातो. तज्ञांच्या मते, बटाट्याचा रस सकाळी नियमितपणे सेवन केल्यास अल्सरवर उपचार करण्यास मदत होते.

३) बद्धकोष्ठता दूर होते.
– बटाटयाच्या रसात भरपूर फायबर असते. जे पचनसंस्थेला साफ करण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका होते.

४) कर्करोगाचा धोका टळतो.
– बटाट्याचे नियमित सेवन कर्करोगाच्या पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यामध्ये ग्लायको आल्कलॉइड्स नावाचे रासायनिक संयुग असते. यामध्ये ट्यूमर-विरोधी गुणधर्म असतात. परिणामी बातात्याचं रस प्यायल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते.

५) संधिवातावर उत्तम उपचार.
– बटाट्याचा रस दाहकविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. जो संधिवात आणि इतर सांधे संबंधित समस्यांवर उपचार करण्यास मदत करतो. यामुळे तज्ञ सांगतात कि, बटाट्याचे तुकडे दुखणाऱ्या भागावर लावल्याने फायदा होतो.