| | |

श्वसनासंबंधित त्रासांवर ‘प्राणायाम’ परिणामकारक; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्राचीन आयुर्वेदपद्धती आणि भारतीय योग यांमध्ये ९९% रोगांचे समूळ निदान आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत यांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच चुकीची जीवनशैली आणि बदलते वातावरण यांचा आपल्या शरीरावर नेहमीच काही ना काही परिणाम होत असतो. कधी सामान्य तर कधी असामान्य परिणामांमुळे आरोग्याचा ऱ्हास होतो. विशेष करून आपल्या श्वसनक्रियेवर या गोष्टींचा अतिशय प्रभाव पडतो. याकरिता ‘प्राणायाम’ हा एक उत्तम पर्याय आहे.

प्राणायाम हा शब्द प्राण आणि आयाम या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. प्राण म्हणजे ऑक्सिजन आणि आयाम म्हणजे घेणे. अर्थात काय तर, शरीरात ऑक्सिजन घेणे म्हणजेच ‘प्राणायाम’. श्वास तर आपण दिवसभर घेतोच पण प्राणायामाची एक विशिष्ट शास्त्रीय पद्धत आहे. प्राणायामामुळे घेतलेला श्वास आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळी विशिष्ट वेळासाठी नियमित प्राणायाम करणे फायदेशीर असते. परंतु श्वासासंबंधित अडचण असेल तर खालील प्राणायामाचे प्रकार लाभदायक ठरतात.

१) नाड़ीशोधन प्राणायाम (अनुलोम विलोम) – अनुलोम विलोम ज्याला शास्त्रामध्ये नाड़ीशोधन प्राणायाम म्हणून ओळखले जाते. शरीरासाठी हा प्राणायाम खूप लाभदायक ठरतो. हा करताना आधी उजव्या नाकाला बोटाने बंद करा आणि यानंतर डाव्या नाकाने श्वास आत घ्या. थोडावेळ असाच श्वास आत रोखून उजव्या नाकाने बाहेर सोडा. पुढे या पद्धतीला उलट्या पद्धतीने करण्यासाठी उजव्या नाकाने श्वास घेऊन डाव्या नाकाद्वारे बाहेर सोडा.
– सुरुवातीला हा प्रयोग ५-१० वेळा करा. यानंतर क्षमतेनुसार वेळ वाढवा.

२) कपालभाती प्राणायाम – ‘कपाल’ अर्थात कपाळ आणि ‘भाती’ अर्थात चमकणे. कपालभाती हा प्राणायाम करण्यासाठी आधी सुखासनात बसावे आणि दीर्घ श्वास पोटात भरून घ्यावा. यानंतर पोट आत बाहेर लोटा. पुढे श्वास बाहेर सोडत पोट आत घ्या. हि प्राणायामाची क्रिया पटपट करायची आहे.
– सुरुवातीला हा प्रयोग १० वेळा लागोपाठ करा. यानंतर क्षमतेनुसार वेळ वाढवा.

३) शीतकारी प्राणायाम – शीतकारी प्राणायाम गळ्याच्या आजाराला दूर करतो, शरीरात थंडावा निर्माण करते, तोंडातील छाले दूर करण्यासाठी देखील उपयुक्त प्राणायाम आहे. यासाठी सुखासनात बसा आणि वरचे-खालचे दांत एकमेकांना जोडा. यानंतर जिभेला वर टाळूला लावा आणि दातामधून श्वास आत ओढा. हळू हळू पूर्ण शरीरात श्वास भरा. यानंतर नाकामधून श्वास बाहेर सोडा.