twins baby

जुळ्या बाळाच्या आनंदाची चाहूल लागताच, अशी करा मनाची तयारी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । अनेक स्त्रियांना आई होणे यासारखा मोठा आनंद वाटत नाही . आई होण्याची क्षमता नसतानाही , किंवा त्यावेळी त्या प्रकारचे वातावरण शक्य नसतानाही अनेक मुली आई होणार हे कळताच अनेक नव्या प्रकारच्या योजना तयार करतात. तसेच आपल्या मनाची तयारी सुद्धा करून ठेवतात अश्या वेळी जर त्यांना अचानक धक्का भेटला कि , त्यांच्या पोटात असणारी बाळे हि जुळी आहेत तर त्यांची पायाखालची मातीच सरकते. त्यांची सुरुवातीला तयारी नसते , पण तरीही मनाची तयारी करून त्या त्यांची कामे करण्याचा प्रयत्न करतात.

एकाच वेळी एक बाळ असलं तरी किती तयारी करावी लागते ? जर एकाच वेळी दोन बाळे असतील तर मात्र खूप  प्रकारे काळजी घ्यावी लागते आणि तयारी सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते , अश्या वेळी आई सोबत बाबा आणि घरच्यांना सुद्धा तयारीत सहभागी व्हावे लागते. सर्वात टेन्शन चे काम म्हणजे अप्लाय घरात दोन जुळे बाळे येणार म्हंटल्यावर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी हि एकाने घेऊन चालणार नाही . त्यांच्या संगोपनासाठी सगळ्यांनी आईला मदत करणे आवश्यक आहे. कारण एकाच वेळी एका बाळाची काळजी खुप चांगल्या पद्धतीने होऊ शकते , दोन बाळाची सगळी काळजी हि एकटी बाई नाही करू शकत . त्यामुळे काही दिवस अगोदर दोन बाळाच्या जन्माची तयारी आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन ठेवा .

बाळाची वाढ होत असताना बाळाची हालचाल मोठ्या प्रमाणात असते . पण एकाच वेळी दोन बाळे असल्यामुळे कोणते बाळ हलले आहे . याकडे लक्ष राहत नाही . बाळ राहण्याची पहिलीच वेळ असेल तर व अश्या वेळी बाळाच्या हालचालीकडे लक्ष जात नाही . तसेच कोणते बाळ हे केव्हा हालले तर सांगता येत नाही . त्यामुळे बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवा . कारण एकाची हालचाल म्हणजे दोघांची हालचाल असे नाही . पोटात दुखण्याच्या समस्या या थोड्या जरी जाणवल्या तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . अगदी छोट्या छोट्या गोष्टी या सुद्धा इतर अनुभवी लोकांना विचारू शकता.