| |

कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांमध्ये आढळली ‘बोन डेथ’ची समस्या; जाणून घ्या कारणे आणि लक्षणं

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोना विषाणूने गतवर्षापासून असा कहर केला आहे त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये वेगवेगळ्या आजारांची लक्षणं दिसून येत आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये आधी म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस या आजारांची लक्षणं दिसली होती. त्यानंतर आता टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, मुंबईतील ४० वर्षांहून कमी वय असलेल्या ३ रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस किंवा डेथ ऑफ बोन टिश्युजची समस्या दिसून आल्याने मुंबईतील डॉक्टर सध्या चिंतेत आहेत.

या रुग्णांवर मुंबईतील माहिममध्ये असणाऱ्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल म्हणाले कि, ‘ त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरच्या भागात दुखणं जाणवलं, ते सगळे डॉक्टर होते म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आलं आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी हॉस्पिटल गाठलं.’ शिवाय कोरोनावरील उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर केल्याने एव्हीएनच्या केसेस पुढे आल्या आहेत.’

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस स्पेशालिस्ट डॉ.अग्रवाल यांनी बायस्फोसफोनेट रिजिम नावाची एक ट्रिटमेंट विकसित केली आहे. जी गेल्या २० वर्षांपासून एव्हीएनच्या रुग्णांवर उपचारार्थ वापरली जाते. त्यांच्या अभ्यासानुसार कोरोनानंतर रुग्णांमध्ये दोन ट्रेंड दिसत आहेत. पहिलं, कोरोना झाला असताना पेशंटला corticosteroid prednisolone या स्टिरॉइडचा 758mgचा डोस दिला गेला आणि हाच डोस 2000mg इतका दिला, तर शरीरात एव्हीएनची समस्या उदभवते. त्यामुळे इतक्या कमी डोसमध्ये हि समस्या होणे चिंतेची बाब आहे. तर दुसर म्हणजे, साधारणपणे स्टिरॉइड्स घेतल्यानंतर ६ महिने ते १ वर्षापर्यंत एव्हीएन विकसित होतो. पण तो कोरोनाच्या रुग्णांमध्ये लवकर विकसित होत आहे.

डॉ. अग्रवाल सांगतात कि, ‘सहसा एव्हीएन विकसित व्हायला इतका वेळ लागत असताना आमच्या रुग्णांमध्ये मात्र निदानानंतर ५८ दिवसांत लक्षणं दिसून आली. कोरोना झालेला असताना स्टिरॉइड्स दिले गेलेल्या रुग्णांना खुब्यात किंवा मांडीत वेदना असतील, तर त्यांनी MRI करून घ्यावा आणि त्यांना हिपचा एव्हीएन झाला नाही ना हे तपासून घ्यावे. त्यांनी जर लवकर बायस्फोनेट थेरेपी सुरू केली, तर हा आजार बरा होऊ शकतो.’ सामान्यपणे एव्हीएन झाल्यावर सर्जरी करावी लागते पण आता ज्या पेशंटना त्याची लक्षणं दिसली त्यांनी तातडीने उपचार घेतल्याने त्यांना सर्जरी करण्याची गरज पडली नाही. आतापर्यंत निश्चित केसेस ३ – corticosteroid हे जीवरक्षक स्टिरॉइड म्हणून कोरोनाच्या रुग्णांना देतात पण त्यामुळे AVascular Necrosis (AVN) होण्याची शक्यता आहे.

  • AVNची लक्षणे –
    १) सांधे दुखीचा त्रास जाणवणे.
    २) शरीरात मरगळ येणे.
    ३) हालाचाली मर्यादित होणे.
  • AVN होण्याची कारणे कोणती?

१) हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा थांबल्याने किंवा खंडित झाल्याने AVN विकसित होतो. शिवाय हाडांना रुक्तपुरवठा न झाल्याने हाडातील टिश्यु मरण पावतात.

२) सांधेदुखीकडे दुर्लक्ष करणे हे देखील AVN होण्याचे कारण ठरू शकते. यामुळे आयुष्यभर सांधेदुखीचा त्रास राहतोच शिवाय हाडांमधील पेशी कमकुवत होऊ लागतात.

३) दीर्घकाळ Corticosteroid किंवा अल्कोहोलचे अत्याधिक सेवन

४) हाडांना दुखापत होणे किंवा हाडं फ्रॅक्चर होणे.

५) ब्लड व्हेसल्सना दुखापत होणे.