| | |

मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळ्याची भाजी आरोग्यदायी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हा एक असा आजार आहे, जो माणसाला आतून हळूहळू पोखरतो. हा आजार वरवर दिसत असला तरीही आरोग्याचे पुरते नुकसान करतो. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना बरीच औषधे खावी लागतात. शिवाय अनेक पथ्यपाणी पाळावे लागते. ज्यानंतर संबंधित रुग्णाला आपल्या जीवनशैलीत बरेच बदल करावे लागतात. या स्थितीत भोपळ्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक ठरते. अनेकांना मधुमेह झाल्यास काय खावे काय खाऊ नये याबाबत जरा संभ्रमित असतात. मुख्य म्हणजे मधुमेहींना खाण्यापिण्याच्या बाबींवर फार काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा हा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. चला तर जाणून घेऊया भोपळा खाणे मधुमेहींसाठी फायदेशीर कसे आहे ते खालीलप्रमाणे:-

– भोपळा कमी कॅलरीयुक्त आहार असून यात अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करता येते.

– मधुमेहाच्या रुग्णांसाठी भोपळा हा फायबरयुक्त असा उत्तम पदार्थ आहे. ज्याद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

– भोपळा या भाजीमध्ये ग्लायसेमिक भार खूप कमी असतो. अशा परिस्थितीत भोपळ्याचे जास्त सेवन केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

– मधुमेहाच्या रुग्णासाठी भोपळा फायदेशीर ठरू शकतो. कारण भोपळ्यात दोन संयुगे असतात, त्यापैकी एक ट्रायगोलाइन आहे आणि दुसरे निकोटिनिक अॅसिड आहे. हे दोन्ही मधुमेहाचे परिणाम कमी करतात.

– मधुमेही आपल्या आहारात भोपळ्याचे सूप, भाजी, भाकरी, डोसा, रस अशा वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकतात. हे सर्व पदार्थ शिजवताना भोपळ्यामध्ये जास्त पाणी वा तेल वापरू नये. हि भाजी जितकी वाफेवर शिजवालं तितकी फायदेशीर आहे.