| |

गुणकारक सब्जा! सब्जा बियांचे आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन : सब्जा बियांचा (चिया सीड) चा वापर अलीकडच्या काही वर्षांमध्ये मानवी आहारात वाढला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यातील जास्त प्रमाणात असणारे ओमेगा-३ स्निग्घ आम्ल आणि तंतुमय पदार्थ. यांमध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे  सब्जा हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे. सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची अमिनो आम्लेही भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे  सब्जा हे हृद्यासंबंधित आजार, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, कर्करोग, पचन क्रियेचे आजार अशा विविध आजारांवर उपयोगी ठरत आहे.

सब्जा याचे शास्त्रीय नाव सॅल्विया हिस्पॅनिका असे आहे. हे पीक जगभरात घेतले जाते. सब्जाच्या बिया गडद काळ्या रंगाच्या असतात. पाण्यात भिजवले असता यांच्यापासून डिंकाप्रमाणे चिकट पदार्थ प्राप्त होतो ज्याला म्युसिलेज म्हणतात.  सब्जाच्या बियांमध्ये आहाराच्या दृष्टीने महत्त्वाची असलेले स्निग्ध आम्ल (अल्फा लिनोलेनिक स्निग्ध आम्ल), तंतुमय पदार्थ, प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ल, अॅन्टीऑक्सिडन्टस, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे प्रमाण आहे. सब्जा बियांमधील प्रथिनांचे प्रमाण हे गहू, मका, तांदूळ, ओट यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यांचा आहारात बिया, तेल किंवा पीठ अशा विविध स्वरूपात वापर केला जाऊ शकतो. सब्जा बियांचा विविध अन्नपदार्थांमध्ये वापर करून त्यांचे पौष्टिक गुण तर वाढविले जातात परंतु त्यासोबतच त्यांच्या चवीमध्ये सुद्धा सुधारणा होते.  सब्जाच्या बियांचा विविध बेकरी उत्पादने जसे की ब्रेड, कुकीज; नूडल्स, आइस्क्रीम, विविध प्रकारचे  ज्यूस, एनर्जी बार अशा अनेक अन्नपदार्थांमध्ये त्यांची पौष्टिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

आरोग्यास फायदे :

सब्जा बियांमध्ये असलेले ओमेगा-३ आम्ल यांमुळे रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. आहारामध्ये जर रोज ३० ग्रॅम (१५-१५ ग्रॅम दोन वेळा) एवढे सेवन केले तर याचा नक्कीच फायदा होईल.  सब्जा बियांमध्ये असणाऱ्या अल्फा लिनोलेनिक आम्लामुळे रक्त दाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.   सब्जा बियांमध्ये असलेल्या प्रथिने, तसेच तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी राखण्यास मदत होते. त्याबरोबरच ते इन्शुलिनचे कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करते.   सब्जा बियांमध्ये अॅन्टीऑक्सिडन्टस भरपूर प्रमाणात आहेत. जे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करते.  सब्जाच्या बियांमध्ये आवश्यक प्रमाणात प्रथिने आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स मुख्यत्वे ओमेगा-३ स्निग्ध आम्ल (अल्फा लिनोलेनिक आम्ल) तसेच तंतुमय पदार्थ (फायबर) असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

सब्जामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) आहेत. ते आपल्या लहान आतड्यांचे आरोग्य तसेच पचन क्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे बध्कोष्ठता असलेल्या लोकांना फायदा मिळू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं.

  • वजन कमी करते – सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
  • बद्धकोष्ठतेचा त्रास – बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासही मदत होते.
  • त्वचासाठी फायदेशीर – प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
  • केसांसाठी फायदेशीर – प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक – हृदयाचं आरोग्य निरोगी राहणं अतिशय आवश्यक आहे. सब्जामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड, अल्फा-लिनोलेनिक अॅसिड जास्त प्रमाणात असतात. या घटकांमुळे आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. तज्ज्ञांचे मार्गदर्शनानुसार पाण्यात सब्जा मिक्स करून या पेयाचे नियमित सेवन करावे. यातील औषधी गुणधर्मांमुळे हृदय विकार दूर राहण्यास मदत मिळते.
  • हाडांच्या आरोग्यासाठी – सब्जामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरस हे घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जे लोक कमी प्रमाणात प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करतात, त्यांनी आपल्या डाएटमध्ये सब्जाचा समावेश करावा.
  • रक्तातील शर्करा नियंत्रणात आणण्यासाठी – सब्जाच्या बियातील पोषक घटक रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित करतात. संशोधनातील माहितीनुसार, सब्जाच्या बियांचे सेवन केल्यानंतर रक्तातील शर्करेची पातळी संतुलित करण्यास मदत मिळू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेहाने ग्रस्त असलेले रुग्ण आहारामध्ये सब्जाचा समावेश करू शकतात.
  • या आजारांवर गुणकारी – • मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्यानंतर पोटात अॅसिडिसी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोट्या-छोट्या समस्या कमी होतात. तसेच शरीराला एनर्जीही मिळते.

सब्जाचे सेवन कसे करावे?

पाण्यामध्ये सब्जा मिक्स करून त्याचे नियमित स्वरुपात सेवन करणं ही एक प्रभावी आणि सोपी पद्धत आहे. ज्युस, पुडिंग, दलिया आणि स्मूदीमध्ये सब्जाचा समावेश केला जाऊ शकतो. कित्येक रेसिपीमध्ये सब्जाचा उपयोग केला जातो, ज्यामुळे पाककृतीतील पोषण तत्त्व नैसर्गिक स्वरुपात वाढतात. पण सब्जाचे कशा पद्धतीने आणि किती प्रमाणात सेवन करावे, याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निरोगी आरोग्यासाठी पौष्टिक आहाराव्यतिरिक्त नियमित व्यायाम करणं देखील तितकेच आवश्यक आहे.