कोरोनाच्या लसीकरणाबाबत पडलेले प्रश्न ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोनाच्या लसीकरणाला सर्व भारतभर सुरुवात झाली आहे. परंतु, सगळीकडे कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे  भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाच्या लसीबाबतीत अनेक समज- गैरसमज निर्माण झाले आहेत.  खेडेगावांमध्ये कोरोनाच्या लसीबाबत उदासीनता दिसत आहे. अनेक लोक लस घेण्यास नकार देत आहेत. अनेकांना असे वाटते कि, कोरोनाची लस घेतली तरी कोरोना होतो, त्यामुळे अनेक जण लस घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतील? त्या प्रश्नाचे निरसन करूया ….

फेब्रुवारीत महिन्यात लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात म्हटलं होतं की कोव्हिशील्ड लसीच उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करत आहे, दोन डोसमध्ये जर ६ आठवड्यांपेक्षा कमी अंतर असेल तर ती ५५.१% परिणामकारक ठरते आणि जर १२ आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले तर लसीची परिणामकारकता ८१.३% इतकी जास्त असल्याचं आढळून आलं. त्यामुळे साधारण लसींमधील अंतर जास्त असणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात कमी असलेले अंतर  केंद्र सरकार कडून वाढवले गेले आहे. कारण जर अंतर वाढवले तर मात्र त्याची परिणामकता जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे.

लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होऊ शकते?

— शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्ही कोरोना लस घेतली आणि त्याबरोबर तुम्ही योग्य प्रकारची काळजी घेतली तर मात्र समस्या जास्त जाणवणार नाहीत. त्यामुळे तुम्ही संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं काळजीपूर्वक पालन करणं गरजेचे आहे. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग , नेहमी सानिडायझरचा वापर करणे आवश्यक आहे.लसीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो, पण तो अत्यंत सौम्य स्वरुपाचा असतो आणि त्यात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.

शरीरात प्रतिकार शक्ती चांगली असल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस देणे आवश्यकच असते. कारण दुसरा डोस किंवा बूस्टर डोस दिल्यानंतरच लस पूर्ण क्षमतेने काम करते.  उदाहरण घायचे म्हंटल तर गोवर, गालगुंड यांची लागण होऊ नये म्हणून लहान मुलांना ही लस दिली जाते. या लसीचे दोन डोस असतात.  ते दोन डोस दिल्यानंतरच ती पूर्ण क्षमतेने काम करते. अनेक वेळा केलेल्या अभ्यासानुसार पहिला डोस दिल्यानंतर ४० टक्के मुलांना संरक्षण मिळते , पण दुसरा डोस दिल्यानंतर फक्त ४ टक्केच लोकांनां धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दुसरा डोस गरजेचा असतो.

भारतात कोणत्या लशी दिल्या जातात? 

भारताच्या औषध महानियंत्रकांनी सीरम इन्स्टिट्यूट बनवत असलेली oxford astrazeneca vaccine india ‘कोव्हिशील्ड’  लस आणि भारत बायोटेक बनवत असलेली, संपूर्ण भारतीय बनावटीची ‘कोव्हॅक्सिन’ लस या दोन्ही लसींना  मान्यता दिली आहे.

कोव्हिशील्डचा पहिला आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला तर चालेल का?

तर भारतात तसं करता येणार नाही. एकाच लसीचे  दोन्ही डोस घेणं बंधनकारक आहे. वेगवेगळे डोस अजून तरी घेतले गेले नाहीत. पण या संदर्भांत अजून तरी संशोधन सुरु आहे. दोन डोस दिल्याने परिणामकारकतेवर आणि व्यक्तीला मिळणाऱ्या संरक्षणावर काय परिणाम होतो? याचा अभ्यास सुरु आहे. पण अजून तरी एकाच लसीचे दोन्ही डोस घेतले जात आहेत.

लस घेतल्यानंतर किती काळ संरक्षण मिळत आहे ?

या विषयावर अजून तरी संशोधन सुरु आहे. पण ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्या लोकांना काही दिवस तरी त्रास होत नाही. म्हणजे त्याच्या शरीरात अँटीबॉडी काही काळ संसर्ग होण्यापासून संरक्षण देतात. पण हे किती काळ टिकू शकते याबाबत अजूनही ठोस माहिती मिळाली नाही.

कोरोनाची लस परिणामकारक आहे का ?

कोणतीच लस १०० टक्के परिणामकारक नसते आणि कोरोनाची लस सुद्धा त्याला अपवाद अजिबात नाही. पण जवळपास ८१ टक्के या लसीचा परिणाम होत आहे , हे लक्षात येत आहे.

मग, लस घेण्याची गरज आहे का ?

केंद्र सरकारने हि लस घेण्यास सांगितले आहे, पण अजून तरी कोणी घायची किंवा घायची नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा निर्णय आहे. पण ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. त्यांच्याद्वारे सुद्धा संसर्ग कमी प्रमाणात इतरांना होऊ शकतो. लसीचा कोणताही डोस घेतला तरी मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लस घेतली याचा अर्थ असा नाही कि, तुम्ही कोरोनापासून पूर्णतः सुरक्षित आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.