Radish For Skin
| | |

त्वचेसाठी मुळा अतिशय फायदेशीर; कसा..? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन जीवनात आपण मुळ्याचा वापर आपल्या आहारात करत असतो. यामध्ये लहान मुले मुळा खाण्यासाठी जरा टाळाटाळच करतात. मुळ्याचे पराठे, मुळ्याचे लोणचे, मुळ्याची कोशिंबीर अशा पदार्थांच्या सहाय्याने मग मुलांना मुळा खाऊ घातला जातो. मुळा आरोग्यासाठी उत्तम आहे. दरम्यान केवळ शारीरिक नव्हे तर त्वचेच्या आरोग्यासाठी देखील मुळा फायदेशीर भूमिका बजावतो.

कारण मुळ्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते. जे त्वचेसाठी अँटि ऑक्सिडंटप्रमाणे काम करते. तर यातील विटामिन सी त्वचेवरील कोलेजन वाढवून त्वचेवर चमक आणण्याचे काम करते. त्यामुळे मुळ्याचा उपयोग त्वचेसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पण कसा..? हे जाणून घेऊ.

> त्वचेच्या समस्यांमध्ये मुळा कसा फायदेशीर ठरतो..?

मुळ्यातील अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्समुळे त्वचा अनेक आजारांपासून दूर राहते. मुळ्यामुळे स्किन सेल्सवर अटॅक करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून बचाव होतो. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारापासूनही संरक्षण होते. त्वचेवरील टिश्यूजचे रक्षण करण्यासाठीदेखील मुळा फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्वचेची समस्या सहसा होऊ देत नाही. शिवाय सुरकुत्या, काळे डाग, एजिंगची या समस्यांपासूनही सुटका मिळते.

> सुंदर त्वचेसाठी मूळ्याचे फायदे :-

१) त्वचा हायड्रेट राहते
मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. जे त्वचेला अधिक पोषण मिळवून देण्यास फायदेशीर ठरते. त्यामुळे त्वचेवर मुळ्याचा वापर करणे वा आहारात नियमित मुळा खाणे यामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय मुळा त्वचेतील विषारी पदार्थ आणि घाण काढून टाकण्यासाठी मदत करतो.

२) त्वचेवरील फ्रेकल्सपासून बचाव
मुळ्यातील अँटि ऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्समूळे त्वचेला चांगले पोषण मिळते. यातील अँटि ऑक्सिडंट्स सर्व फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात. त्वचेवर आलेल्या फ्रेकल्सपासून बचाव करायचा असेल वा सुटका करून घ्यायची असेल तर मुळा यावर उत्तम उपाय आहे. यासाठी ताज्या मुळ्याचा रस कापसाच्या सहाय्याने त्वचेवर लावा आणि १५- २० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा.

३) कोरड्या त्वचेपासून सुटका
निरोगी, तेजस्वी आणि मुलायम त्वचा हवी असेल तर मुळ्याचा रस, ओटमिल पावडर, पांढरे अंडे फेटून हे मिश्रण स्क्रब म्हणून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या मऊ आणि निरोगी होते. शिवाय मॉईशराइज होते आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते.

४) मुरुमांपासून संरक्षण
मुळ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट राहते. त्यामुळे त्वचेवरील नको असलेले सेल्स आणि इतर घाण निघून जाते. मुळ्याच्या सेवनाने शरीरात पाण्याची पातळी व्यवस्थित राहून त्वचेला योग्य हायड्रेशन मिळाल्याने त्वचेवरील मुरूमं दूर होतात.