| |

पिकलेल्या केळ्याइतकेच कच्चे केळे आरोग्यदायी; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। केळं जितकं खायला चविष्ट तितकंच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हे एक असं फळ आहे जे चवीने खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अगदी वजन वाढण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन्हीप्रकारे केळं मदत करणारे फळ आहे. पण तुम्हाला माहित आहे का? जेवढं फायदेशीर पिकलेलं केळं आहे तितकंच फायदेशीर कच्चं केळंही आहे. कारण कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमीन-सी, मॅग्नेशियम, कॉपर, व्हिटॅमीन बी- 6 हि सर्व शरीराला पूरक असणारी पोषक तत्त्वे समाविष्ट असतात. हि सर्व पोषक तत्त्व आपल्या शरीरातील उर्जेच्या पातळीला चालना देतात आणि आपली कार्यप्रणाली व चेतासंस्था योग्य रीतीने कार्यरत राहते. जर तुम्हाला कच्चे केळे खाण्याचे फायदे माहित नसतील तर लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) डिप्रेशन व भीती दूर होते – कच्च्या केळ्यात ट्रिप्टोफॉन नामक एक विशेष घटक असतो. जो शरीरात गेल्यानंतर सेरोटॉनिनमध्ये बदलतो आणि सेरोटॉनिन मेंदूसाठी हॅपी हार्मोन्ससारखे काम करते. परिणामी आपण डिप्रेशन आणि भीती अश्या समस्यांपासून सुरक्षित होतो.

२) पचनशक्ती सुधारते – कच्च्या केळ्याची भाजी आठवड्यातून २-३वेळा खाल्ल्याने पोटासंबंधीत समस्या दूर होतात आणि पचनप्रणालीचे रक्षण होते. परिणामी पचनशक्ती सुधारते व खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते.

३) डायरियापासून आराम – कच्च्या केळ्याचे सेवन केल्यास डायरियासारख्या आजारात आराम मिळतो. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन सहज होते. कारण यात फायबर्स आणि पाण्याची मात्रा असते. जे शरीरातील सर्व पोषक तत्त्वं मजबूत बनवतात आणि डायरियासारख्या आजारापासून आराम मिळण्यास मदत करतात.

४) बद्धकोष्ठतेवर परिणामकारक – बदलत्या जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या आजकाल फार सामान्य झाली आहे. ज्यामुळे प्रत्येक दिवशी पोटाशी निगडीत समस्या अनेकांना जाणवतात. त्यामुळे फायबरयुक्त कच्च्या केळ्याची भाजी यावर अतिशय लाभकारी मानली जाते. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *