Red sandalwood is effective on your face

लाल चंदन आपल्या चेहऱ्याला आहे प्रभावी

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या चेहऱ्याच्या काळजीसाठी आपण दररोज वेगवेगळे प्रॉडक्ट वापरत असतो. त्यामुळे कधी कधी आपल्या चेहऱ्यावर खूप चांगला प्रभाव हा पडत असतो. चंदन हे आपल्या चेहऱ्याला मुलायम बनवते. तसेच आपला चेहरा उजळण्यास मदत करते. लाल पिंपल्स चा वापर केल्याने आपल्या चेहऱ्यावर अश्या प्रकारे प्रभाव पडू शकतो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात …..

कोरड्या त्वचेसाठी —–

हिवाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. कारण वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. तुमची त्वचा नाजूक असल्यामुळे ती लवकर कोरडी आणि हिहायड्रेट होते. त्यात जर तुमची त्वचा मुळातच कोरड्या प्रकारची असेल तर त्वचेच्या समस्या अधिकच वाढतात. मात्र लाल चंदनाच्या तेलाने तुम्ही तुमची त्वचा मऊ आणि मुलायम करू शकता.

त्वचेवर ग्लो येण्यासाठी —–

आपण सतत कुठेना कुठे फिरत असतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते . जर जास्त प्रमाणात पिंपल्स आले तर मात्र आपला चेहरा हा रुक्ष होण्यास सुरुवात होते. धुळ, माती, हवेतील प्रदूषण यामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि खराब होते. मात्र अशावेळी त्वचेवरील नैसर्गिक ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी त्वचेवर नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. यासाठी लाल चंदन पावडर आणि नारळाचे तेल, बदामाचे तेल एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा.

डेड स्किन निघून जाण्यासाठी —

आपल्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर चंदन लावा. त्यामुळे चेहऱ्यावरच्या सगळ्या सेल मरून जाण्यास सुरुवात होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आपल्या चेहऱ्यावर चंदनाचा लेप हा लावला जावा. चंदन हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळानंतर ते चंदन थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे त्वचेला थंडावा येण्यास मदत होते.