Reduce gutkha or tobacco stains on teeth

दातावरील गुटखा किंवा तंबाखूचे डाग असे करा कमी

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक आहेत , कि त्यांच्या तोंडात नेहमी गुटखा किंवा तंबाखू असते . आणि सतत कुठे ना कुठे पिचकारी मारत असतात . इतरांना त्याची घाण वाटते . जर तंबाखू किंवा गुटखा यांचे प्रमाण हे नेहमीचे असेल तर त्यावेळी त्यांच्या दातांवर आणि हिरड्यांवर पिवळा रंगाचा थर हा जमा होतो. तसेच दात हे पिवळे दिसायला सुरुवात होते . अशी लोक ज्यावेळी चार लोकांच्यात येतात किंवा बोलायला सुरुवात करतात त्यावेळी त्यांच्या तोंडाची दुर्गंधी हि जास्त येते . अशा वेळी त्या लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न अनेकजण करतात . अनेक जणांना अशी लोक समोर उभे राहिली तरी खूप घाण वाटते . त्यामुळे दातांवरील पिवळा डाग काढणे हे फार गरजेचे असते .असे रंगाचा थर निघून जाण्यासाठी काय उपाय करू शकतो ते जाणून घेऊया ……..

गुटखा हा खूप प्रभावी असतो. त्यावेळी त्याचे डाग काढण्यासाठी काही प्रमाणात बेकिंग सोडा घ्या . त्याच्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आणि ते दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या दातांना लावून साफ करा. काही दिवसांतच आपले दात हे पांढरेशुभ्र होतील. दातांवरील डाग हे घालवण्यासाटी आहारात गाजराचा समावेश करा. त्यामुळे गाजराने त्वचा सुद्धा चकाकते . गाजरामध्ये असलेले तंतू हे आपले दात हे साफ करतात. थोड्या पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचा वापर करा.

दातांचे डाग काढून टाकण्यासाठी संत्रीचे साल काढून टाका . त्याची साल उन्हात सुकवून त्याचे मिश्रण तयार करा. पावडरच्या मदतीने सकाळ आणि संध्याकाळ घसा. सकाळ आणि संध्याकाळ दररोज ब्रश करा. ब्रश करण्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी सुद्धा कमी कमी होऊ शकते .