oil

रिफाईंड ऑइल हे शरीरासाठी हानिकारक आहे , तर मग कोणते तेल वापरणे योग्य आहे ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  आपल्या दररोज च्या आहारात तेलाचं वापर हा केला जातोच . कोणताही पदार्थ बनवण्याचा असेल तर त्यावेळी मात्र तेल हे वापरावे लागतेच . बाजारात अनेक वेगवेगळ्या  तेलाचे प्रकार आहेत.  या तेलांचा वापर जर आहारात केला तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका हा जास्त असतो. त्यामुळे वजन वाढू शकते वेगवेगळ्या प्रकाचे आजार कदाचित वाढू शकतात . असे तेल लहान मुलांबरोबर मोठ्या लोकांसाठी सुद्धा पोषक नाही. त्यामुळे आहारात कोणत्या तेलाचा वापर करणे आवश्यक आहे , ते जाणून घेऊया ….

आहारात तेलाचा समावेश करताना लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचा  करावा . कारण  ते तेल   कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता तयार केलेले असते . तसेच ते जास्त काळ टिकते . त्याचा वास हा दुर्गंधी सारखा अजिबात येत नाही . त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी योग्य आणि लाभकारक सुद्धा आहे .

— हे तेल तयार करताना पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .

— शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .

— शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात .

.— लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो .

— लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .

— शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .

— शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .

— — हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे .

— लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते .

— आहारात शेंगदाणा आणि सूर्यफूल हे अतिशय योग्य असते . शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे हिमोग्लोबिन वाढते .

— शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ, जवस, मोहरी, खोबरेल, खुरसणी, अक्रोड, बदाम ह्यांचे तेल वापरा पण ते मात्र भेसळ युक्त नसेल याची खात्री करून घ्या .