Vaccination
|

मुलांच्या लसीकरणासाठी उद्यापासून नोंदणी सुरु; कसे करालं बुकींग? लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या दोन वर्षात नाकी नऊ आणलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी संशोधकांनी प्रतिबंधक लसींचा शोध लावला आणि जगभरात अतिशय वेगाने लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. हि लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर केवळ १८ वयोवर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्तींचा लस मिळत होती. यामुळे पालकांना आपल्या मुलांच्या तब्येतीची काळजी वाटणे आणि कोरोनाची भीती वाटेनं अतिशय स्वाभाविक होते. यानंतर अखेर आता पालकांना दिलासा मिळतोय. कारण १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या नवीन वर्षात सुरु होत आहे.

भारत बायोटेकची कोविड-१९ लस Covaxin’ला लहान मुलांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. PTI नुसार, १५-१८ वयोगटातील व्यक्तींना दिली जाणारी ही एकमेव लस असेल. येत्या २०२२ मधील पहिल्याच महिन्याच्या ३ तारखेपासून हे लसीकरण वेगात सुरु होईल. मात्र, त्यासाठीची नोंदणी पालकांनी १ जानेवारीपासून Cowin पोर्टलवर करायची आहे. आता हि नोंदणी कशी करायची याबाबत अनेकांच्या मनात शंका कुशंका आल्या असतील. तर त्या प्रत्येकाच्या शंकेचे निरसन आम्ही करणार आहोत. तर जाणून घ्या लहान मुलांच्या लसीसाठी बुकिंग कसे कराल ते खालीलप्रमाणे?

० कशी करालं नोंदणी?
– येत्या १ जानेवारी २०२२ पासून Cowin पोर्टलवर लहान मुलांसाठी लसीची नोंदणी सुरू होत आहे.
रस्ताही ओळखपत्र म्हणून विद्यार्थ्यांचे शाळेचे वा महाविद्यालयाचे ID जोडले जाईल. यामुळे तुमच्या मुलाचे वय १५ ते १८ च्या मध्ये असेल तर हे ओळखपत्र जरूरीचे आहे.
– याशिवाय जर मुलांना ID मिळाले नसेल वा हरवले असेल तर ते पुन्हा एकदा काढा.
कारण पोर्टल नोंदणीनंतर ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरु होत आहे.
माहितीनुसार, तूर्तास भारतातील मुलांना कोव्हॅक्सीन लस देण्यात येईल आणि २ डोसमध्ये २८ दिवसांचे सामान्य अंतर ठेवले जाईल.