lice

केसांमध्ये उवा झाल्यास हे करा उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  मुलींचे केस खूप लांब असतात. लांब केसांची निगा राखणे गरजेचे असते. केस जर मोठे आणि जाड असतील तर त्यावेळी मात्र आठवड्यातून कमीत कमी दोनदा केस स्वच्छ करणे आवश्यक असते. जर केस स्वच्छ राहिली गेली नाहीत तर  केसांमध्ये उवा होण्यास सुरुवात होते. उवा झाल्याने केसांमध्ये इजा होतात . सतत खाज सुटते. डोक्याच्या काही भागात पांढरट असा पट्टा तयार होतो. अशा वेळी कोणत्या घरगुती उपायांचा वापर करून आपल्या केसांच्या उवा दूर करू शकतो. ते जाणून घेऊया ….

— उवा कमी करण्यासाठी वेगवेगळे घरगुती उपाय वापरले जातात. लसूण हा उवा यांना मारण्यास मदत करते . लसूण हा खूप प्रभावी आहे. त्याची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये काही प्रमाणात लिंबाचा वापर करा. तो रस आपल्या केसांच्या सर्व भागाला लावा.

— कडुलिंबाच्या वासाने सुद्धा उवा या मारल्या जातात. कडुलिंबाच्या  बिया असतात, त्या बिया बारीक कुठून त्याच्यापासून पावडर तयार करा. त्यालाच लिंबोळ्याची पावडर असेही म्हंटले जाते. हि पावडर केसांना लावली असता, उवा वासाने मरतात.

— उवा दूर घालवण्यासाठी कांदा कापून त्याचे मिश्रण बनवा. आणि ते मिश्रण हे आपल्या केसांना लावा. त्यामुळे उवांचा प्रादुर्भव कमी होत जातो.  तसेच कांदा हा केस वाढण्यास सुद्धा मदत करते.

— उवा डोक्यात असतील तर सतत आपला हात डोक्यात जातो, त्यामुळे जखमा या होऊ शकतात. अशा वेळी कडवट तेलाचा वापर हा आपल्या केसांसाठी करा.

— प्रत्येकाच्या घरात मुंगी मारण्यासाठीचा खडू असतो. तो खडू डोक्याला लावला तर त्याच्या मदतीने उवा या मारल्या जातात.

— खोबरेल तेल आणि कापूर याचे मिश्रण एकत्र तयार करून ते आपल्या केसांसाठी लावू शकता.

— सीताफळाच्या बिया किंवा पाने एकत्र मिश्रण करून ती पावडर आपले केस धुण्यासाठी वापरली तर उवा लवकर निघून जातील.

— सीताफळाची कोवळी पाने सुद्धा आपल्या केसांना लाभकारी असतात.