| | |

लाल भाताची पेज आजारपणात आधार; जाणून घ्या कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आजारपणं कोणतंही असो यात आपला आहार हा हलका, पौष्टिक आणि तितकाच ऊर्जा देणारा असणे आवश्यक आहे. कारण आजारपणात आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात अशक्तपणा असतो. तो दूर करण्यासाठी आहार हा संतुलित असायलाच हवा. पण म्हणजे नक्की काय? तर लहान असताना आजारपणात आपली आई आपल्याला भाताची पेज करून द्यायची. आठवतंय का? काही ठिकाणी या पेजेला कांजीदेखील म्हणतात. परंतु, भाताची पेज म्हणजे आजारी व्यक्तीचं खाणं असा काही समज करून घेऊ नका. कारण भाताची पेज हि आजारी व्यक्तीशिवाय कुणीही खाऊ शकतो. हा पदार्थ अत्यंत हेल्दी आहे आणि हलका सुद्धा. त्यामुळे आजारपणात आणि आजारपणाशिवाय भाताची पेज खाणे लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊया भाताची पेज बनवण्याची पद्धत आणि फायदे खालीलप्रमाणे:-

० भाताची कशी बनवाल पेज?
– भाताची पेज बनवणे अगदी सोप्पे आहे. कुणीही सहज बनवू शकते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
* साहित्य –
लाल तांदूळ/ साधे तांदूळ – १ कप
पाणी – ३ ते ४ कप
काळीमिरी पूड – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
साजूक तूप – १ छोटा चमचा

* कृती – पेजेचे लाल तांदूळ किंवा साधा तांदूळ स्वच्छ करून पाण्याने धुवून घ्या. यानंतर ३ ते ४ कप पाण्यात तांदूळ उकळा. साधारण अर्धे कच्चे शिजल्यानंतर त्याचे पाणी गाळून घ्या. यानंतर त्यात चवीपुरता मीठ घालून गरमगरम प्या.
याशिवाय अगदी मऊ शिजवलेला पेजेचा भात थोडेसे सजून तूप घालून खा.
या व्यतिरिक्त पेजेच्या भाताच्या पाण्यामध्ये चवीपुरता मीठ, काळामिरी, साजूक तूप मिसळून खाता येईल.

० फायदे –

१) पेज प्यायल्यामुळे अशक्तपणा दूर होतो.

२) भूक वाढते.

३) शारीरिक थकवा दूर होतो.

४) शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.

५) हलकी असल्यामुळे सहज पचते.

६) तांदळाच्या पेजेमध्ये थोडासा गूळ घातल्यास रक्ताची कमतरता दूर होते आणि ऍनिमियाचा धोका टळतो.

७) बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

८) वजन कमी असल्यास पेजेमध्ये थोडं साजूक तूप घालून खावे. यामुळे वजन वाढतं.