|

कोरोना बाधितांना ‘ब्लड क्लॉटिंग’चा धोका? जाणून घ्या काय आणि कसा होतो हा रोग

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोरोना व्हायरसमुळे गेल्या वर्षापासून आतापर्यंत न जाणे कित्येकांनी आपला जीव तर कित्येकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. तर अनेकांनी कोरोनावर मात देखील आहे. मात्र ते हि सध्या विविध आजारांना बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांना पोस्ट कोविडनंतर मधुमेहाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यात भर म्हणून आता कोरोनमुक्त रूग्णांमध्ये रक्त गोठण्यासंबंधीचा एक रोग समोर आला आहे. ज्याला ब्लड क्लॉटिंग किंवा थ्रोम्बोसिस असे म्हणतात.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कोविडनंतर दुर्मिळ रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका सामान्य लोकांपेक्षा १०० पट जास्त आहे. यामुळे लोकांच्या आणि आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. तर जाणून घेऊयात काय आहे ब्लड क्लॉटिंग? तो कश्यामुळे होतो? आणि शरीरात कुठे होतो?

१) ‘ब्लड क्लॉटिंग’ म्हणजे काय? आणि का होतो?
– डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचे विषाणू शरीरात गेल्यास शरीराच्या अवयवांमध्ये सूज येणे सुरू होते. परिणामी हृदय कमकुवत होऊन त्याचा थेट परिणाम हृदयाचा ठोकाच्या गतीवर पडतो. यामुळे हळूहळू शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. याला रक्त गोठणे अर्थात ‘ब्लड क्लॉटिंग’ असे म्हणतात. या रक्ताच्या गुठळ्यांमुळे हृदयापर्यंत रक्त नीट पोहोचत नाही आणि हृदय खूप कमकुवत होते. या दरम्यान हृदय कार्य करण्यास सक्षम नसते. हृदयाच्या अकार्यक्षमतेमुळे हा रोग बळावतो. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

२) कोरोना बाधित रूग्णांमध्ये हा रोग का आढळतोय?
– जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, कोविड रुग्णांच्या १५ ते ३० टक्के रुग्णांमध्ये हा आजार झाल्याचे उघडकीस आले आहे. याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस असे म्हणतात. तज्ञांच्या मते हा विषाणू फुफ्फुसांशी आणि रक्ताशी संबंधित आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता आधीच खचलेली असते. यामुळे शरीरातील अवयव त्याच्या क्षमतेप्रमाणे कार्य करण्यास सक्षम नसल्यामुळे हा रोग त्यांच्यामध्ये आढळून येत आहे.

३) ‘ब्लड क्लॉट्स’ शरीरात कुठे तयार होतात?
– एका संशोधनानुसार, कोविड रूग्णांपैकी जवळ जवळ ३० ते ३५ टक्के लोकांना ही समस्या त्रास देताना दिसत आहे. आपल्या शरीरातील रक्तपेशी ज्यांच्याद्वारे आपल्या अवयवांना रक्त पुरवठा होत असतो हे ब्लड क्लॉट्स प्रामुख्याने त्यांच्यामध्ये तयार होतात आणि यामुळे शरीरातील रक्तपुरवठ्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या शरीरात कुठेही तयार होण्यास सुरुवात होते.