| |

कोरोनावर मात केलेल्यांना सायटोमेगॅलो व्हायरसचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट हळू हळू ओसरताना दिसते आहे. मात्र चिंतेची बाब अशी कि, त्याचा परिणाम बर्‍याच काळासाठी दिसून येत आहे. शिवाय असे निदर्शनास येत आहे कि, कोरोनामधून बरे होणारे रुग्ण अन्य आजारांना बळी पडत आहेत. आता पर्यंत कोरोनामुक्त रुग्णांमध्ये फंगल संसर्ग, रक्त साकळणे, सायटोकाईन, हॅप्पी हायपॉक्सिया इत्यादी आजार असल्याची लक्षणे आढळली होती. परंतु आता यात आणखी एका आजाराची भर पडली आहे.

रेक्टल ब्लीडिंग हे या आजाराचे नाव असून त्याचा सायटोमेगॅलो व्हायरसशी संबंध आहे. कोरोनातून बरे झाल्यावर अवघ्या २० ते ३० दिवसातच या लोकांना हा आजार होत आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये या आजाराची ५ प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील एकाचा मृत्यू देखील झाला आहे.
चला तर जाणून घेऊयात या आजाराची लक्षणे आणि उपचार:-

  • सायटोमेगॅलो व्हायरसच्या संक्रमणाची लक्षणे :-
    – सर्वसाधारण तापमानापेक्षा शरीराचे तापमान अधिक असणे.
    – श्वसनप्रक्रियेत अडथळा निर्माण होणे.
    – शारीरिक थकवा जाणवणे.
    – शारीरिक वा मानसिक अस्वस्थता जाणवणे.
    – घशात खवखव अथवा तोंडाची चव कडवट होणे.
    – स्नायू आणि सांधेदुखीमध्ये असह्य वेदना जाणवणे.
    – अचानक वजन कमी होणे.
    – भूक न लागणे.
    – नेहमीपेक्षा कमी जेवण जाणे.
    – ग्रँथींमध्ये सूज चढणे.
    – डोकेदुखी.
    – मेंदूला सूज येणे.
  • सायटोमेगॅलो व्हायरसच्या संक्रमणाची कारणे –
    हा रोग द्रव पदार्थांच्या माध्यमातून पसरतो. जसे की शरीरातील रक्त, तोंडातील लाळ किंवा शरीरातील इतर द्रव्य. अगदी कोरोना विषाणूंप्रमाणे या व्हायरसचे विषाणू देखील सहज संक्रमित होतात. ह्यामुळे एखाद्यास संक्रमण झाले असता दुसरा कुणी संपर्कात आल्याने हा रोग एकमेकांमध्ये पसरतो.
  • उपचार –
    मुळात हा आजार अशा लोकांना प्रभावित करतो, ज्यांना स्टिरॉईड्सचे डोस जास्त प्रमाणात दिले आहेत. तसेच त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कोरोना संक्रमणादरम्यान कमकुवत झाली आहे. त्यामुळे या रोगापासून प्रतिबंधात्मक उपचार करणे शक्य आहे. सध्या या रोगापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून मोठ्या प्रयत्नावर संशोधन चालू आहे. मात्र अद्याप तरी यावर कोणतेही अचूक उपचार मिळालेले नाहीत. परंतु एका संशोधनानुसार, अँटी वायरल औषधांच्या मदतीने या रोगाचा होणार प्रसार रोखला जाऊ शकतो.