साल्मोनेला आतड्यांसाठी घातक संक्रमण; जाणून घ्या लक्षणे

0
245
आवडल्यास नक्की शेअर करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन। साल्मोनेला हा एक प्रकारचा जीवाणू आहे. हा जिवाणू अन्नजन्य आजार पसरवितो. या बॅक्टेरियाने दूषित झालेला कोणताही पदार्थ खाल्ल्याने आतड्यांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांना साल्मोनेलोसिस म्हणतात. हा जीवाणू सामान्यतः प्राणी आणि मानवांच्या आतड्यांमध्ये आढळतो. मुख्य म्हणजे, या जीवाणूचा वास घेता येत नाही वा तो डोळ्यांना दिसतही नाही.

० साल्मोनेला संक्रमण पसरण्याचं कारण

१) साल्मोनेला संसर्ग मुख्यतः कच्चे वा कमी शिजवलेले मांस, कुक्कुटपालन वा अंडी उत्पादनांच्या सेवनामुळे होतो.

२) साल्मोनेला जीवाणू कच्च्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्येही लपलेला असू शकतो. त्यामुळे भाज्या व फळे खाताना काळजी घ्या.

३) वॉशरूममधून आल्यानंतर वा बाळाचे डायपर बदलल्यानंतर हात व्यवस्थित स्वच्छ न धुतल्यानेसुद्धा साल्मोनेलाचा संसर्ग पसरतो.

४) अनपाश्चराइज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांमुळेही साल्मोनेलाचा संसर्ग होतो.

लक्षणे – साल्मोनेला रोगाची लक्षणे साधारणपणे आठवड्याभरात दिसतात. ५ वर्षांखालील लहान मुलांसाठी आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी हे संक्रमण अधिक धोकादायक आहे. यात खालील लक्षणे दिसतात.
– मळमळ,
– उलट्या,
– पोटात मुरड पडणे,
– पोटदुखी,
– जुलाब,
– ताप,
– थंडी वाजून येणे,
– डोकेदुखी,
– शौचामधून रक्त पडणे.

..तर डॉक्टरांशी संपर्क साधा – साल्मोनेलाने संक्रमित असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर बहुतेक लोकांना पोटात वेदना होतात. याची लक्षणे ६ ते ७ दिवसांनी कोणत्याही उपचाराविना निघून जातात. पण यानंतरही आराम वाटत नसेल तर ३ दिवसांपेक्षा जास्त काळ जुलाब, १०२ डिग्री फॅरेनहाइट ताप, वारंवार उलट्या, तोंड कोरडे, मळमळ अशी लक्षणे दिसतात. यातील कोणतेही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जा आणि उपचार सुरु करा.


आवडल्यास नक्की शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here